आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ हा घात पात का खून चर्चेला उदान

अहिल्यानगर जिल्हा चीफ ब्युरो प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे संपर्क 70 286 23 100

अहिल्यानगर दिनांक २५/०१/२०२६ देवळाली प्रवरा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू= नेमके कारण काय? राहुरी तालुक्यातील देवलाळी प्रवरा भागातील बिरोबा वाडी येथिल रस्त्यालगतच्या एका शेतकऱ्याच्या विहिरी मध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदर विहिरीच्या काठावर एक बेवारस दुचाकी आढळून आल्याने आत्महत्या की घातपात असा संशय बळावला आहे. त्या मुळे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी शोध मोहिम हाती घेतल्या नंतर सदरचे विहिरीत सुनिल बाळासाहेब तुपे या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठ्यप्रमाणावर खळबळ उडाली आहे. अण्णासाहेब टीक्कल यांच्या शेतातील विहीरीच्या काठावर एम एच 17 सी पी 9849 या क्रमांकाची दुचाकी आढळूनआली. परंतू चालक मात्र बेपत्ता असल्याने अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे सुनिल बाळासाहेब तुपे हा तरुण थेट विहीरीत पडला असावा अशी शंका वर्तविली जात आहे.त्या नंतरअग्नीशमन दलाचे पथकाला पाचारण करण्यात आले. शोध घेत असताना सुरुवातीला तरुणाची बॅग हाती लागली. आणि शंका खरी ठरली. शेवटी अथक परिश्रमानतर स्थानीक तरुण व अग्नी शमन दलाचे जवान यांचे मदतिने मृत देह बाहेर काढण्यात आला. सदर मृत देहाची बारकाईने तपासणी केली असता सुनिल बाळासाहेब तुपे (वय 30) रा. लाख रोड. देवळाली प्रवरा अशी मृत देहाची ओळख पटल्यांतर सेव विच्छे दनासाठी मृत देह रुग्ण वाहिकेच्या साहाय्याने राहुरी येथे पाठविण्यात आला . मात्र हि घटना मध्यरात्री घडली असल्याने हा घात की अपघात अशी ही चर्चा परिसरात मोठया प्रमाणात चालू असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. घटना स्थळी पोलिस उप निरीक्षक राजेंद्र जाधव व पोलीस हवालदार राहुल यादव हे आवर्जून उपस्थित होते.
या वेळी नगराधेक्ष सत्य जित कदम. नगर सेवक संतोष चोळके. प्रकाश सौसारे. अमोल कदम. राजेंद्र लोखंडे. वृषभ लोढा. सौरभ मुसमाडे. यांचे सह नागरिकांनी गर्दी केली होती. याच बरोबर अग्नी शमन दलाचे कर्मचारी सोमनाथ सुर्यवंशी. अशोक पंडित. भारत साळुंके. यांचे सह संपूर्ण अग्नी शमन दलाचे पथकाने मदत कार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button