अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांची शिक्षा
नागपुर दिनांक २२/०३/२०२६ अल्पवयीन मुलीचा विनयभंग Actims केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपीला दंडही ठोठावला आहे. ही घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी काटोल तालुक्यातील हातला परिसरात घडली होती.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आपल्या १२ वर्षे सहा महिन्यांच्या मुलीसह रेशनचे धान्य आणण्यासाठी मोपेडवर गेले होते. धान्य घेऊन परत येताना हातला बसस्टॉपजवळ आरोपी वैभव संजय पोजदार (वय २६, रा. हातला, ता. काटोल) याने तक्रारदाराला गावापर्यंत सोडण्याची विनंती केली. तक्रारदाराने विश्वास
ठेवून त्याला मोपेडवर बसू दिले. मात्र चारगावजवळ पोहोचल्यावर आरोपीने अचानक तक्रारदाराच्या मुलीचे दोन्ही हात पकड्न तिच्याशी अधील वर्तन केले. तसेच तिच्या अंगाला अयोग्य प्रकारे स्पर्श करून विनयभंग केला. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देत पळ काढण्याचा
प्रयत्न केला. या घटनेनंतर तक्रारदाराने तात्काळ काटोल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस उपनिरीक्षकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी वैभव पोजदार याला दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून दंडाचीही तरतूद केली आहे.

