आर्थिकक्रीडादेश-विदेशविशेषशहर

भांबरी शिवारात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई – २.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ जण ताब्यात

पोलीस क्राईम न्यूज लातूर विशेष प्रतिनिधी

लातूर दिनांक ०४/०५/२०२६ जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात सुरू ठेवलेल्या कठोर मोहिम अंतर्गत दिनांक 3 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील भांबरी शिवारात धाड टाकत “तिर्रट” नावाच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत पाच जणांना रंगेहात पकडले असून, तब्बल ₹२,१७,०६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०३ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १७:१० वाजण्याच्या सुमारास, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वातील पथकाने भांबरी शिवारातील एका शेतात नारळाच्या झाडाखाली बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाले वरून माहितीची शहानिशा करून सायं. १७:४० वाजता संबंधित ठिकाणी धाड टाकण्यात आली. छाप्यात पाच इसम गोलाकार बसून “तिर्रट” नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्वरित सर्वांना ताब्यात घेत पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य, मोबाईल, वाहन असा एकूण ₹२,१७,०६०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून

या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

१) शाबाज हमीद शेख (रा. वसवाडी पाखरसांगवी, लातूर)

२) इंजमाम भुरेखा पठाण (रा. जाफर नगर, लातूर)

३) सागर जयद्रथ जाधव (रा. खाडगाव रोड, लातूर)

४) अविनाश आनासाहेब बनसोडे (रा. पटेल नगर, लातूर)

५) आसिफ अय्युब उमाटे (रा. खाडगाव रोड, लातूर)

वरील सर्व आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या तिर्रट जुगार खेळत व खेळवत असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पथकामधील पोउपनि अमर केंद्रे, पोलीस अंमलदार, साहेबराव हाके,अर्जुनसिंग राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे, प्रविण कोळसुरे यांनी केले आहे.

            लातूर जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, जुगार, सट्टा, मटका यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button