समाज सुधारला तर देश आपोआप सुधारेलआम्ही भारतीय आहोत याचा अभिमान आहे. शोएब शेख

पोलीस क्राईम न्यूज विशेष प्रतिनिधी
लातूर दिनांक ०६/०५/२०२६ समाज सुधारला तर देश आपोआप सुधारेल
आम्ही भारतीय आहोत याचा अभिमान आहे ज्यां स्वातंत्र्य सेनानी यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा दिला आपल्या कुटुंबीयाची आहुती दिली जिवाची पर्वा न करता बलीदान देशातील दिलें ते स्वातंत्र्याच्या इतिहासकार ठरलें कारण एका समुहाने नव्हे तर विविध जाती ,धर्माच्या पलीकडे आम्ही भारतीय म्हणून जगत असतांना आपण ही राष्ट्र व समाजाचे देणे आहोत हा विचार आज ख-या अर्थाने करण्याची गरज आहे समाज हा अनेक व्यक्तींच्या एकत्रित जीवनाचा आधार असतो. या समाजात काही लोक असे असतात जे स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाच्या कल्याणाला अधिक महत्त्व देतात. अशा व्यक्तींना सामाजिक कार्यकर्ता असे म्हटले जाते. सामाजिक कार्यकर्ता हा समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कार्य करत असतो. सामाजिक कार्यकर्त्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील समस्या ओळखून त्यांचे निराकरण करणे. जसे गरिबी, अशिक्षण, बेरोजगारी, व्यसनाधीनता, पर्यावरण प्रदूषण यांसारख्या समस्यांवर तो काम करत असतो विविध संकल्पना करत असतांना लातुरात ही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष यांच्या नावाने प्यारे खान युवा फाऊंडेशनची संकल्पना व त्या माध्यमातून समाजात सामाजिक कार्य करतं असतांना उन्हाचे तापमान पाहता मोलमजुरी करुन आपली उपजिविका भागवणारे गरजवंत यांना फुल नव्हे फुलाची पाकळी देण्याची तळमळ आपणं इतरासांठी काही तरी करावं या हेतुने शोएब शेख कार्य करताहेत तसेच डिझीटल मिडिया लातुर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून ही सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी योगदान देताहेत असं हे कार्य पाहता प्यारे खान युवा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सालार शेख यांच्या हस्ते त्यांच्या कार्याची दखल घेऊन यथोचित सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान प्रेरणादायी ठरेल व येणा-या पिढीला भविष्यात प्रेरणा मिळेल असा उल्लेख त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला कारण की
लोकांमध्ये प्रेरणा जागरूकता निर्माण करते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करते . समाजात समानता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता सतत प्रयत्नशील असतो.
सामाजिक कार्यकर्त्यामध्ये काही विशेष गुण असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे सहानुभूती, प्रामाणिकपणा, संयम आणि सेवा भावना असावी. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मदत करण्याची तयारी असणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही आणि समाजासाठी सतत काम करत राहतो.
आजच्या काळात सामाजिक कार्यकर्त्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. अनेक स्वयंसेवी संस्था (NGO) आणि व्यक्ती समाजाच्या विकासासाठी काम करत आहेत. स्वच्छता मोहिमा, शिक्षण प्रसार, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल होत आहेत.
शेवटी असे म्हणता येईल की, सामाजिक कार्यकर्ता हा समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. त्याच्या निस्वार्थ सेवेमुळे समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. आपणही आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण “समाज सुधारला तर देश आपोआप सुधारेल.” हा सन्मान म्हणजे आई वडील यांनी दिलेले संस्कार व संगोपन जेवढं संकटांना सामोरे जाण्याची ताकद देतात तेवढंच बळ आज प्यारे खान युवा फाऊंडेशन ने दिले असल्याचे शोएब शेख यांनी मत व्यक्त केले



