महाराष्ट्रविशेषशैक्षणिक

27 वर्षाच्या इसमाने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी विवाह करून पिंपळदेव या गावी त्या मुलीला ठेवले होते उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी त्या मुलीची सुटका केली

बीड जिल्हा चीफ ब्युरो विनोद पटाईत संपर्क 70 286 23 100

बीड दिनांक ,२४/०१/२०२६१४ वर्षाच्या मुलीचा गेवराई मधे बालविवाह AHTU ने मुलीला ताब्यात घेवून पोस्टे गेवराई येथे केला गुन्हा दाखल दिनांक २३/०१/२०२६ रोजी सकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिनांक २३/१२/२०२५ रोजी पिंपळादेवी ता. जि. बीड येथे एका १४ वर्षाच्या मुलीचा बालविवाह झाला आहे व ज्याच्याशी विवाह झाला आहे तो व्यक्ती ही पिंपळादेवी मधलाच आहे. त्यावरून, AHTU टीम पिंपळादेवी गावात दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार बालविवाह झालेल्या घरी टीम गेली असता, बालविवाहित पीडित मुलगी घरी मिळून आली. तिला विश्वासात घेवून तिचे समुपदेशन केले व तिला तिच्या लग्नाबाबत विचारपूस केली असता, तिने सांगितले की, तिचा विवाह दिनांक २३/१२/२०२५ रोजी साई सिध्दी हॉल गेवराई शहर येथे, सिद्धार्थ मधुकर आवारे वय २७ वर्षे रा. पिंपळादेवी ता. जि. बीड याच्यासोबत झाला आहे. सदर पीडित मुलगी मधुकर आवारे यांच्या घरात मिळून आल्याने, त्यांना दोघांना ताब्यात घेतले व पुढील कारवाई साठी पोस्टे गेवराई येथे हजर केले. तसेच पीडित मुलीचे आईवडील व सिद्धार्थ आवारे यांना फोन करून पोस्टे गेवराई ला हजर होण्यास सांगितले. गेवराई येथे गेल्यावर PSI पल्लवी जाधव यांनी साई सिध्दी हॉलच्या मैनेजर कडे चौकशी केली असता, त्यांनी बुकिंग कामी घेतलेले वर-वधू चे वयाचे पुरावे दाखवले. ते पाहून असे समजले की मुलीचे वय जास्त दाखवण्यासाठी खोटे आधारकार्ड बनवले होते. ज्यात तिचे वय १९ दाखवण्यात आले होते. ते कागदपत्रे ताब्यात घेवून पोस्टेला जमा करण्यात आले. तसेच बालविवाहाचा गुन्हा दाखल करणेकामी सहायक बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी तथा मुख्य सेविका,नामे रत्नमाला बाबूराव बारकुल, एकात्मक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय बीड यांना घटनेची फोनद्वारे सर्व माहिती देवून पोस्टे गेवराई ला बोलावून घेतले.
गेवराई येथे आल्यावर त्यांनी पीडितेशी संवाद साधून सर्व माहिती घेतली व पोस्टे गेवराई गुरनं ४७/२०२६ कलम ९, १०,११ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये ५ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. PSI पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीच्या काळजी व संरक्षणासाठी तिला बालकल्याण समिती बीड यांचे समक्ष हजर केले.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, शोभा जाधव, प्रदीप येवले, अशोक शिंदे , पोशी गजानन चौधरी सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button