आर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसंपादकीय

शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारी ट्रॅक्टर.व ट्रॉली चोरी करणारी टोळी.सिन्नर पोलिसांच्या ताब्यात

.पोलीस क्राईम न्यूज नाशिक विभाग खानदेश प्रमुख शशिकांत भालेराव.
नाशिक सिन्नर तालुका दि.25/03/2026 सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे विहिरी व नदीकाठा वरील पाण्याचे इलेक्ट्रिक मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असताना त्या अनुषंगाने सिन्नर पोलीस स्टेशन कडील गुन्हेशोध पथक चोरट्यांचा मागोवा घेत असतांना पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे सिन्नर पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहिती मिळाली की रात्रीच्या सुमारास शेतातील शेत पंप चोरी करणारी चोरटे सिन्नर बस स्थानक परिसरात येणार आहे त्याप्रमाणे सिन्नर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने बस स्थानक परिसरात सापळा रचून माहितीच्या वर्णनानुसार तीन संशयित इसम नामे 1) निलेश दत्तु सोनवणे वय 34 रा. ब्राम्हणवारडे ता. निफाड जि. नाशिक 2) राहुल विलास गायकवाड वय 26 वर्ष रा.सोमठाणे तालुका सिन्नर यांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की बेलु ता. सिन्नर तसेच लासलगांव व सिन्नर तालुक्यातील परिसरात रात्रीच्या सुमारास जावून शेतपंप चोरी केले आहे तसेच साथीदार नामे 1) भारत बाळासाहेब जगताप रा. खानगाव थडी ता. निफाड फरार 2) श्रावण सुरेश पिंपळे रा . नैताळे ता.निफाड फरार 3) शोयब शेख रा. तासदिंडोरी ता. निफाड फरार असून यांनी तालुका निफाड येथून एक ट्रॅक्टर ट्रॉली तसेच कोपरगांव येथुन एक बुलेट मोटार सायकल चोरी करून घेऊन आमचे मार्फत कमी किमतीस विक्री केल्याची कबुली दिल्याने आरोपींकडून शेतपंप विक्री करून आलेली रोख रक्कम रू3,17000/- तीन लाख सतरा हजार रुपये मात्र मुद्देमाल जप्त केला. त्याचा तपशील1) रू.100000/_निळसर रंगाची दोन चाकी ट्रॅक्टरचीट्रॉली.2) रू.12000/-दोन पाणबुडी शेत पंपाचे इलेक्ट्रीक मोटार )3)2,00000/- एक सफेद काळ्या रंगाची रॉयल इनफील्ड कंपनीची 350 क्लासिक मोटार सायकल बुलेट 4) रू 500/- च्या 10 नोटा रोख रक्कम असा मुद्देमाल आहे. सदर अटक करण्यात आलेल्या आरोपींवर सिन्नर पोलीस ठाण्यात गुरव नं 50/2026 भा.न्या.सांहिता303(2)3(5)व कोपरगांव शहर पो.ठाणे कडील गुरव नं 114/2026 भान्यासं 303(2) गुन्हे उघडकीस आले आहे यातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार असून नाशिक जिल्ह्यात विविध पो. स्टेशन मध्ये त्यांच्यावर चोरी, दरोडा या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. सदरची कारवाई नाशिक ग्रा पो अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पो अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पो अधिकारी कांतीलाल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सिन्नर पो. ठाण्याचे पोनि हेमंतकुमार भामरे पो. अंमलदार समाधान बोराडे नितिन डावखर पोशि विनोद टिळे कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड प्रशांत सहाणे यांच्या पथकाने कारवाई केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना दिनकर पारथी हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button