Uncategorized

मयत अभिषेक रामचंद्र दिवाण (वय २८ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून, घटनेमुळे निमजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

पोलीस क्राईम न्यूज खानदेश चीफ ब्युरो अनिकेत उमरेडकर
कळमेश्वर दिनांक २२/०३/२०२२ निमजी येथील तरुणाने मंगळवारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मयत अभिषेक रामचंद्र दिवाण (वय २८ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून, घटनेमुळे निमजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी लगेच आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. अभिषेकला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती

मिळताच कलमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. अभिषेकने हे टोकाचे पाऊल कां उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस तपास करत आहेत. तरुण मुलाच्या अशा जाण्याने दिवाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button