आरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेष

दीड वर्षाच्या चिमुकलीला साई संस्थानाच्या आवारात सोडून जाणाऱ्या नालायक दांपत्याला शोधून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे

पोलीस क्राईम न्यूज अहिल्यानगर जिल्हा चीफ ब्युरो
प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे

शिर्डी दिनांक २९/०३/२०२६, साईबाबा संस्थान परिसरातील प्रसाद भोजनाच्या आसपास दिनांक 16 मार्च रोजी दुपारचे सुमारास साधारणपणे एक दीड वर्षाची बालिका बेवारस अवस्थेत आढळून आली. सदरची ही बालिका साई भोजनालय परिसरामध्ये एकटीच खेळत असल्याचे काही साई भक्तांच्या. लक्षात आले. परंतु बराच वेळ झाला तरीही त्या ठिकाणी त्या मुलीचे कुणीही पालक आढळून येत नाही असे लक्षात येतात तेथील जागरूक नागरिकांनी शिर्डी पोलिसांना या संदर्भात तात्काळ माहिती दिली.
शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजीत गलांडे यांनी घटनेची तात्काळ दखल घेत संदीप उदावंत आणि पथकाला तात्काळ घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांचा परिसरात शोध घेतला परंतु पालक वर्ग पैकी कुणीही आढळून आले नाही. मुलीला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तेथेही सदर बालीकेला शोध न्याकरिता कुणीही आले नाही. म्हणून सदर मुलीला ^सबका मालिक एक^ प्रतिष्ठानच्या अनाथ आश्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश दळवी यांचे स्वाधीन करण्यात आले. सदरच्या घटनेतील सापडलेली मुलगी लहान असल्यामुळे तिला बोलता येत नव्हते. त्यामुळे पोलीस तपासात अडचणी निर्माण झाले आहेत. बालिकेचे नाक टोचलेले असून तिच्या हाताला बारा बोटे आहेत. परंतु ही एक लहान बालिका शिर्डीत कशी आली व तिचे पालकतिला का सोडून गेले. याबाबत सखोल तपासणी करण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे शोध घेत असून बारकाईने तपासणी चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button