सिन्नर पोलीसांनी सराई चोरट्यास अटक करून 2 मोटर सायकल आणि 1 मोबाईल जप्त केला.

पोलीस काईम न्युज नाशिक जिल्हा चीफ ब्युरो शाशिकांत भालेराव
नाशिक दिनांक ३१/०३/२०२६ जिल्हयातील तालुका सिन्नर पोलीस स्टेशन हददीत मोटार सायकल चोरी व घरफोडी गुन्ह्यांला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदच्या तक्रारींची गंभीर दखल घेवून अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी के.के पाटील यांनी सिन्नर पो ठाणे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार भामरे पोलीस निरीक्षक सिन्नर ठाणे यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार सिन्नर पो.नि भामरे यांनी गुन्हे शोध पथकातील पो.ठा. अमंलदार समाधान बोराडे नितीन डावखर विनोद टिळे कृष्णा कोकाटे प्रशांत सहाणे अप्पासाहेब काकड यांना सुचना दिल्या असतांना सिन्नर पो नि हेमंतकुमार भामरे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार गोरख बाळू पिंपळे रा गुरेवाडी ता. सिन्नर हा मोटर सायकल चोरी करण्यास सिन्नर येथील सदरवाडी परिसरातआलेला आहे अशी खात्रीशीर बातमी समजल्याने गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सदरच्या आरोपातील सराईत गुन्हेगार गोरख बाळू पिंपळे वय 35 वर्षे रा. झापवाडी लोटस शाळेजवळ सिन्नर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या कडे विनाक्रमांकाची एक प्लॅटीना मोटार सायकल मिळून आली सदर मोटर सायकल बाबत चौकशी केली असता त्याचा भाऊ बाळा पिंपळे याने चोरी करून आणुन दिलेली असल्या बाबत सांगितले. सदर आरोपीच्या गोरख पिंपळे यांच्या कब्जातून एक मोटर सायकल, रेडमी कंपनीचा मोबाईल व चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली प्लॅटीना मोटार सायकल असा एकूण रु 60’000/- किंमतीचा मुद्देमाल आरोपी कडून हस्तगत करण्यात असुन सिन्नर पो. ठाण्यात दाखल असलेला गुरवनं 205/2026 भान्यासंक 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असलेला चोरी 1 चा गुन्हा उघडकीस आला असुन सदरील आरोपीवर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, मोटरसायकल चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहे. सदर आरोपीवर वावी पो. स्टेशन मध्ये गुरव नं 188/2022 भादविक 457,380 गुरव नं 149/2022 भादविक 395, गुरव नं 247/2022 भादविक 395,397 तसेच सिन्नर पो. ठाण्यात गुरव नं 202/2022 भादविक 379
वाडीव -हे पो ठाणे मध्ये गुरव नं153/ 2022 भादविक 379 आणि मनमाड पो ठाण्यात गुरव नं 174/2022 भादविक 379. अशा प्रकारचे चोरी,जबरीचोरी, दरोडा घरफोडी चे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदरच्या आरोपी वर दाखल आहेत सदरच्या आरोपीला सापळा अटक करण्यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पो. अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक अप्पर पो.ग्रा पो. अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पो. अधिकारी सिन्नर के के पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार तसेच सिन्नर पो स्टेशन चे पो.निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाचे अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांच्या पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे. पुढील तपास पोहवा हेबांडे करत आहे.



