आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहर
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस मृतदेह आढळला

पोलीस क्राईम न्यूज विदर्भ प्रमुख अनिकेत उमरेडकर
नागपूर दिनांक २५ एप्रिल २०२६ , कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस मृतदेह आढळला कळमेश्वर: तालुक्यातील दहेगाव (कळमेश्वर) वरून नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गेट पुलाच्या समोरील कुबडे गुरुजी यांच्या शेतात आज एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
पोलीस प्रशासन व सामाजिक सहकार्य:
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर मृतदेह उत्तरपिपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे हलवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत आणि तपासात खालील अधिकाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे:
- मार्गदर्शन: पोलीस निरीक्षक, कळमेश्वर – माननीय श्री. मनोजजी काळबांडे साहेब
- तपास पथक व सहकार्य: श्री. सुनीलजी मिश्रा, श्री. पवन गायकवाड
- विशेष सहकार्य: श्री. मंगेशभाऊ गमे (यांनी स्वतःची रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून देत मोलाचे सामाजिक सहकार्य केले.)
कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, जर कोणास या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.



