आरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेष

बीड पोलिसांची कामगिरी 24 तासा च्या आतअल्पवयीन मुलीचा शोध व पोस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह् चीफ ब्युरो विनोद पटाईत , संपर्क 70 286 23 100

बीड दिनांक ,17/01/2026 AHTU कडे तपास वर्ग होताच २४ तासात अल्पवयीन पीडितेचा शोध व आरोपीला घेतले ताब्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची (AHTU) बुलढाणा येथे कार्यवाही

पोस्को बीड ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२५ कलम १३७(२) भान्यास हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे दिनांक १५/०१/२०२६ रोजी दुपारी वर्ग झाला होता. पोउपनि पल्लवी जाधव यांनी मूळ फाइल चे अवलोकन केले. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांची भेट घेऊन गुन्ह्या संदर्भाने चौकशी केली. मिळालेल्या तांत्रीक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करुन पीडित मुलगी व आरोपी रोशन गवई रा. सोनाळा ता. संग्रामपुर जि. बॅलडाणा यांचे वास्तव्य बुलढाणा जिल्ह्यात असल्याचे समजले. त्यावरून रात्री ०९:०० वाजता AHTU ची टीम ही मा. एसपी सर यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्ह्याकडे रवाना झाली. दिनांक १६/०१/२०२६ रोजी सकाळी ०३:०० वाजता, मिळालेल्या माहितीनुसार टीम सोनाळा तालुका संग्रामपुर जि. बुलढाणा येथे पीडित व आरोपीचा शोध घेत त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहचली व त्यांना ताब्यात घेतले. पोस्टे सोनाळा येथे त्यांची नोंद करून, टीम त्यांना घेवून बीड कडे रवाना झाली. AHTU टीम सकाळी ०९:०० वाजता बीड ला आली. पीडित मुलीला विश्वासात घेवून तिचे समुपदेशन केले तसेच तिच्या आईवडिलांसोबत तिची भेट करून दिली. त्यानंतर पोस्टे बीड ग्रामीण येथे सदर पीडीत मुलगी व आरोपीला पुढील तपासकामी हजर केले.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, पोशी योगेश निर्धार , गजानन चौधरी, सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button