आरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशहर

अन्न व औषध प्रशासन नाशिक यांच्यामार्फत पान मसाल्याचा कारखाना उद्ध्वस्त

नाशिक जिल्हा चीफ ब्युरो शशिकांत भालेराव संपर्क 70 286 23 100

नाशिक दिनांक 06/01/2026 ,अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय व अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक यांच्या संयुक्त पथकाने सं जीवन रेशीम उद्योग दाढेगाव पिंपळगाव रोड नाशिक या समोरील गोडाऊन मध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी प्रतिबंधित मान मसाल्याचे अवैधरित्या उत्पादन सुरू असल्याचे आढळले या कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी तेथे हजर व्यक्तीस नामे राम अवतार शिपुदेवी राहणार राजस्थान याची चौकशी करून तेथून पान मसाल्याचे उत्पादन करण्याच्या दोन मशीन पान मसाल्याच्या 70 बॅगा कच्चे अन्नपदार्थ जसे कात,जर्दा फ्लेवर इत्यादी एकूण रुपये 7, 29,640 किमतीचा साठा जप्त करून सदरच्या गोडाऊन चा पुनर्वापर करू नये यासाठी सीलबंद करण्यात आले अन्नसुरक्षा अधिकारी नाशिक यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे अन्नसुरक्षा कायदा व भारतीय न्याय संहिता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसामार्फत करण्यात येत आहे सदरची कारवाई मनीष सानप सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली अमित रासकर सुहास मंडलिक संकेत यलमामे किशोर चांदगुडे अन्नसुरक्षा अधिकारी नाशिक व अंमली पदार्थविरोधी पथक नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजेंद्र पाटील यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button