
पोलीस क्राईम न्यूज रामटेक चीफ ब्युरो ज्योती ताई यादव
रामटेक दिनांक, १३/०३/२०२६, परिसरात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आणि मृतदेह शेतात पुरल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
रामटेक-तुमसर रोडवरील दुरिस्ट ढाब्याचे मालक कैलास ठाकरे (रा. नवरगाव) यांनी आपल्या नवरगाव शिवारातील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह गुपचूप पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या
आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान ढाब्यावर काम करणारे शिवराम मरकाम (वय ५० वर्षे), धर्मराज वरठी (वय ४५ वर्षे) आणि धीरज वानखेडे (वय ३७ वर्षे) यांना ताब्यात घेऊन
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक प्रताप बैस हा वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करायचा. २६ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता ढाब्याच्या बाजूला असलेल्या गोठ्यात दोरीचा फास तयार केल्याचे पाहून पीयूष ठाकरेने त्याला विचारणा केली. त्यावेळी झालेल्या वादातून संतापाच्या भरात पीयूषने दोरीचा फास गळ्यात टाकून प्रताप बैस याला ठार मारले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर आरोपींच्या मदतीने शेतात खड्डा खणून मृतदेह पुरण्यात आला. या प्रकरणी पीयूष ठाकरे, कैलास ठाकरे, शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखेडे या पाच आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), २३८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सर्व आरोपीना अटक करण्यात आली आहे.
विचारपूस करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाब्यावर काम करणारा कुक प्रतापसिंह महादेवसिंग बैस (ठाकूर) याचा मृतदेह शेतात पुरल्याचे समोर आले. त्यानंतर रामटेक पोलिसांनी
तहसीलदारांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून शेतातून मृतदेह उकरून काढला. पुढील तपासात डाबा चालक पीयूष कैलास ठाकरे (वय २३) याने खून केल्याची कबुली दिली.



