Uncategorized

कसबे वणी परिसरात अल्पवयीन पिडीत मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक.

पोलीस क्राईम न्यूज शाशिकांत भालेराव नाशिक खानदेश प्रमुख

नाशिक दि. १०/०३/२०२६ जिल्हा नाशिक ता.दिंडोरी कसबे वणी परिसरातअल्पवयीन पिडीत मुलीवर बलात्कार करून तिला वारंवार बदनामी करण्याचीआणि घरच्या सदस्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आरोपी नामे दानीश शेख रा. कसबे वणी याच्या कसबे वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला परंतू आरोपी अल्पवयीन पिडीत मुलीवर बलत्कार करून फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सुचनांचे पालन करून स्थानिक गुन्हे शाखा कसबे वणी आणि अभोणा पोलीस स्टेशनची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती. त्याच प्रमाणे आरोपीतांचे नातेवाईक मित्र परिवार यांची सखोल चौकशी केली असता गुप्त माहीती नुसार फरार आरोपी कोपरगांव जि. अहिल्यानगर परिसरात असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली असता तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नामे दानिश रईस शेख वय 21 वर्षे रा संस्कृतीनगर कसबे वणी ता.दिंडोरी जि. नाशिक यास ताब्यात घेतले असून मा. न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी आरोपीस 5 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वणी पोलीस स्टेशनच्या सपोनि गायत्री जाधव यांचे पथक करीत आहे. या घटनेमुळे वणी येथे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे तसेच सद्या वणी पो. ठाणे हद्दीतील शांततेचे वातावरण आहे.
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरणकुमार सूर्यवंशी यांनी सदर प्रकरणी तात्काळ दखल घेऊन अल्पवयीन पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक करण्याच्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वणी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव अभोणा पोलीस स्टेशन सपोनि योगिता कोकाटे,वणी पो.स्टेशनचे उपनि कुटे पो अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, प्रितम लोखंडे, निलेश सावकार, सपोनि जाडर मपोहवा मीरा गावीत पोहवा क-हाड पोकॉ चौरे, आहेर पोहवा हेमंत गिलबीले पोना प्रदीप बहीरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button