आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर

तीन वर्षीय चिमुकली वर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेविरोधात उदयनगर ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध केला

बुलढाणा जिल्हा चीफ ब्युरो सतीश पैठणे संपर्क 7028623100
बुलढाणा दिनांक25/11/2025, उदयनगर कडकडीत बंद; चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येस दोशी ला फाशीची शिक्षा चि ग्रामस्थांची मागणी उदयनगर : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेविरोधात उदयनगर ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळून तीव्र निषेध नोंदविला. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या एकमुखी मागणीसह आज दि.२५ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी बंद पाळला
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मानवतेला काळिमा फासला असून पीडितेला न्याय मिळावा या घटनेचा तीव्र निषेध करून ग्रामस्थांच्या वतीने अमडापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन दिले दवाखाने,मेडिकल, दूध डेअरी वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी उदयनगर वासियांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button