Uncategorized

परभणी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने अकोला येथे जाऊन भेट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचे घेतली

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क 70 286 23 100

अकोला दि, ६/१/२०२५, शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांची आई विजयाबाई व्यकंट सुर्यवंशी, भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी. मावशी तेजश्री विटकर, मावसा दिगंबर यल्लपा विटकर यांनी अकोला येथे येऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अपेक्षा व्यक्त केली सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस प्रशासन पाहिजे त्याप्रमाणात तपास करीत नाही अशी खंत सुद्धा सुर्यवंशी कुटुंबाने व्यक्त केली आहे. तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांचा भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी याने पोलीस प्रशासनातील व सत्ताधारी वर्गातील काही लोकांनी ५० लाख रुपये देऊ तुम्ही शांत बसा, कुणाचेही ऐकू नका असा खळबळजनक खुलासा सुद्धा केला आहे मनुवादी वृत्तीचे सत्ताधारी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्ये संदर्भात संशयाच्या भोव-यात आहेत. कारण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत मारहाणीमुळे झाल्याचा पोस्ट मॉर्डम रिपोर्ट आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन योग्य ती कार्यवाही करुन न्याय देणार नाही हे ऊघडं सत्य आहे लोकशाही मध्ये सत्ताधारी माजोर झाले असतील आणि न्याय नाकारत असतील अन्यायी भुमिका घेत नसतील तर विरोधी पक्षांनी प्रकरण लावून धरुन सत्य ऊजागर केले पाहिजे ही अपेक्षा आहे परभणी मधील शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी सांत्वनासाठी आणि खोटं आश्वासन देण्यासाठी आतापर्यंत विरोधी पक्षातील बहूतेक सर्वच नेते जाऊन आले आहेत प्रसंग माणसं ओळखणे शिकवितो. विजयाबाईं सुर्यवंशी यांचा तरुण मुलगा जो वकील होणार होता. त्याच्या कडून त्याच्या कुटुंबाला खूप अपेक्षा होत्या तो मारला गेला. मारेकरी माहित असूनही शासनकर्ते त्यांना पाठिशी घालतं आहेत आणि विरोधक राजकारण करीत आहेत हे पिडीत कुटुंबातील सोमनाथ सुर्यवंशी यांची आई आणि भावाला चांगलं कळून चुकले आहे सुर्यवंशी कुटुंबाकडे शरद पवार गेले. अजित पवार गेले.शिंदे सेना,ठाकरे सेना,नाना पटोले गेले. विजय वेड्ट्टीवार गेले. रामदास आठवले गेले. चंद्रशेखर आझाद गेले. होते नव्हते ते सगळे राजकीय नेते गेले.त्यांची तोंडदेखली भाषा आणि सोपस्कार त्या सोमनाथ च्या आईला समजले, तीनं ते हृदयात साठवलं आणि समजून घेतलं ज्या माऊलीचा तरणाताठा आणि कुटूंबाला आकार देणारा मुलगा गेला. तीला न्यायाची अपेक्षा आहे सोमनाथ सुर्यवंशी यांची आई आणि भाऊ यांनी सातत्याने येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याकडे पुरावे देऊन आमच्या कुटूंबाला न्याय द्या सोमनाथ चे मारेकरी शोधून त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. मागणी केली मात्र प्रत्येकाने कानाडोळा केला. विरोधक राजकारण करीत आहेत. पुरोगामी म्हणून येणारे सरंजामी वृत्तीचे आहेत. आंबेडकरवादी म्हणून येणारे दलाल वृत्तीचे आहेत हे समजून घेतल्यानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबाला न्याय मिळविण्यासाठी एकच आधार दिसला. नव्हे एकच आधार हे मनोमन पटले म्हणून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबातील सदस्यांनी अकोला येथे येऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आहे आणि न्ययाची अपेक्षा व्यक्त केली आहे लोकशाही प्रजासत्ताक राज्यात अतिशय क्रुरपणे पोलीस कोठडीत जबर मारहाण करुन माणसं मारली जातात आणि खुन्यांना पाठिशी घातले जाते ही अमानवीयता, पाशवी कृत्ये संपवण्यासाठी मानवतावादी, कणखर तथा न्यायी नेतृत्वाची गरज आहे. आणि ते नेतृत्व एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये आहे असा विश्वास सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबाने अनुभवला आणि म्हणून त्यांना न्याय मिळवून देणारं नेतृत्व म्हणून एकमेव प्रकाश आंबेडकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button