Uncategorized

लातूर आंबेडकर पार्क येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना!

मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100

लातूर दि १/१/२०२५, १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना!
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर व महिला शाखा लातूर. यांच्या वतीने १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आंबेडकर पार्क लातूर. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून मानवंदना देण्यात आली, आणि सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यानंतर १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा इतिहास प्रा. शिवाजीराव गाडे सर यांनी कथन केला. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आयु. डी. एस. नरसिंगे सर यांनी समता सैनिक दल व भीमा कोरेगाव शौर्य दिनाविषयी तुलनात्मक मार्गदर्शन केले. यानंतर रामेगाव, लातूर. येथे झालेल्या धम्म परिषदेमध्ये पहिला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराचे मानकरी आयु. डी. एस. नरसिंगे सर, आयु.अमृतराव सूर्यवंशी सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आणि समता फोर्स साठी निवड झालेल्या महिला सैनिक आयु. लता किरण कांबळे, शुभांगी विशाल कदम, साक्षी सिद्धार्थ सूर्यवंशी, व सपना सिद्धार्थ सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
महिला जिल्हाध्यक्ष शारदाताई हजारे, जिल्हा उपाध्यक्ष कविताताई कांबळे यांनी शौर्य दिनानिमित्त उपस्थिताना शुभेच्छा दिल्या तसेच या
कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विनोद भाऊ खटके, सुफीभाई सय्यद, समता सैनिक दलाचे लातूर जिल्हाप्रमुख मेजर जनरल आयु. राजाराम साबळे, जिल्हा सरचिटणीस अशोक शिंदे, डिव्हिजन ऑफिसर विकास दांतराव, जिल्हा सचिव अभिमन्यू लामतूरे, जिल्हा संघटक अर्जुन कांबळे, जिल्हा सचिव आनंद डोनेराव, जिल्हा सचिव रवी कांबळे, महिला तालुकाध्यक्ष सुनीताताई भालेराव, तालुकाध्यक्ष दत्तात्रय भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष मायाताई कांबळे, उषा धावारे, छायाताई उबाळे, सैनिक मीनाक्षी ससाने, देवराव जोगदंडे, अर्जुन वाघमारे, तसेच समता सैनिक दलाचे सर्व सैनिक, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व बौद्ध उपासक उपसिका प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आयु. विलास आल्टे व राजाभाऊ उबाळे यांनी केले. तर आभार आयु. हिराचंद गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप सरणतय गाथेने झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button