
बीड जिल्हा चीफ ब्युरो विनोद पटाईत संपर्क 70 28623100
बीड दि,15/12/2025. शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे जाळे उधळले, आठ गाड्या जप्त – आरोपी अटकेत बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोटरसायकल चोरीचे जाळे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या कारवाईत बीड शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून आठ (08) चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा उमेश अंतरकर, वय 25 वर्षे, रा. शिवशक्ती नगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर असे आहे. फायनान्समधून चोरीकडे – गुन्ह्याची पद्धत उघड प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सदर आरोपी यापूर्वी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. कामाच्या काळात हप्ते थकवलेल्या दुचाकी गाड्या ओढून आणण्याचे (रीपोझेशन) काम तो करीत होता. याच कामातून त्याला वाहन उचलण्याचे कौशल्य व सवय लागली. याच कौशल्याचा गैरवापर करून आरोपीने पुढे मोटरसायकल चोरी करण्यास सुरुवात केली. चोरी केलेल्या मोटरसायकली तो पाथर्डी परिसरात विक्रीस काढत असे.
“मी फायनान्स/बँकेत काम करतो”, “या गाड्या हप्ते थकित असल्याने ओढून आणलेल्या आहेत” अशी खात्री देऊन आरोपी नागरिकांचा विश्वास संपादन करीत होता. फायनान्समध्ये काम करतो अशी ओळख असल्यामुळे नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सदर मोटरसायकली खरेदी केल्या. गाड्या आणि पैसे दोन्ही गमावले – नागरिकांचे दुहेरी नुकसान बीड शहर पोलिसांच्या तपासात सदर मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या सर्व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या कारवाईमुळे संबंधित खरेदीदारांनाखरेदी केलेल्या मोटरसायकली गमवाव्या लागल्यातसेच त्या बदल्यात दिलेली रक्कमही गमवावी लागलीअशा प्रकारे नागरिकांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे.पोलीस कारवाई
मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या आठ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री. शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश जाधव,
पोलीस अंमलदार श्री. गहिनीनाथ बावनकर,
पोलीस अंमलदार श्री. राम पवार,
पोलीस अंमलदार श्री. इलियास शेख , मंगेश शिंदे,
पोलीस अंमलदार श्री. शौकत शेख
तसेच बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांचा विशेष सहभाग होता. यातून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आले असून.. आणखी गुन्ह्यातील सहभाग् सिद्ध आणि निश्चित होणार आहे.
पोलीसांचे आवाहन बीड शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की— दुचाकी वाहने नेहमी सुरक्षित व सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या ठिकाणीच पार्क करावीत. वाहन दोन वर्षांपेक्षा जुने असल्यास, त्यास डबल लॉक, हँडल लॉक तसेच आवश्यकतेनुसार व्हील लॉक वापरावे. फायनान्सची गाडी आहे ओढून आणलेली आहे” अशा कारणांवर वाहन खरेदी करताना संपूर्ण कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नयेसंशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा व्यवहार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. मोटरसायकल चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बीड शहर पोलीस कटिबद्ध असून, नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे



