कळमेश्वर तालुक्यात महसूल सेवा आता आपल्या दारी !
पोलीस क्राईम न्यूज विदर्भ प्रतिनिधी अनिकेत उमरेडकर
नागपूर दिनांक,१०/०३/२०२६ प्रलंबित प्रकरणांना मिळणार वेग : मंडळनिहाय समाधान शिबिरे कळमेश्वर : राज्य शासनाच्या महसूल
विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर निवारण करण्यासाठी आणि एकाच दिवसात सेवा संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा-१’चे आयोजन करण्यात आले आहे. तालुका प्रशासनाने यासाठी कंबर कसली असून, मार्च ते मे या कालावधीत तालुक्यातील विविध
शिबिरात मिळणार प्रमुख सेवा दाखले वितरण : उत्पन्न, अधिवास (डोमिसाईल), जात आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे, जमीन अभिलेख दुरुस्ती: सातबारा व ८-अ उताऱ्यांमधील त्रुटींची दुरुस्ती, फेरफार प्रकरणे : प्रलंबित फेरफार अर्जाचा त्वरित निपटारा, महसूल सुधारणा : वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरण, तुकडेबंदी व अकृषक संदर्भातील मार्गदर्शन, डिजिटल सेवा : ई-मोजणी, पीएम किसान आणि अॅग्रिस्टॅक सेवांची माहिती व नोंदणी, सामाजिक योजना : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची छाननी व मंजुरी.
मंडळांमध्ये या शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार विकास बिक्कड यांनी दिली.
तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात तेलकामठी ७ मार्च, गोंडखैरी १४ मार्च,
मोहपा १० एप्रिल, धापेवाडा १७ एप्रिल, नगर परिषद कळमेश्वर ८ मे आणि १५ मे रोजी शिबिर आयोजित केले जाईल. नागरिकांनी विशेषतः शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांच्या कागदपत्रांसह संबंधित शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे. शासनाच्या या
लोकाभिमुख अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढणे हा आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना दाखल्यांसाठी किंवा जमिनीच्या कामांसाठी वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासन थेट नागरिकांच्या दारी पोहोचणार आहे. गावागावांत दवंडी, सोशल मीडिया आणि फलकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

