आरोग्यक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्र
धापेवाडा – आदासा रोड अपघात : तत्काळ मदतीसाठी मंगेशभाऊ गमे धावले

पोलीस क्राईम न्यूज विदर्भ प्रमुख अनिकेत उमरेडकर
नागपूर दिनांक 0 मार्च 2026 रोजी धापेवाडा – आदासा रोडवर दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती मिळताच समाजसेवक मंगेशभाऊ गमे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी स्वतःची अँम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी जाऊन जखमी नागरिकांना तातडीची मदत केली.
जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी मंगेश भाऊ गमे यांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना अँम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात उपचारासाठी हलवले. अशा कठीण प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहणे हीच खरी जनसेवा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिले.
या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर बरे व्हावे हीच सदिच्छा. तसेच वाहनचालकांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करून सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.



