खाणीत सापडला तरुणाचा मृत्यूदेह रांजणगाव परिसरावर दुःखाची छाया पसरली असून सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण गाढवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

पोलीस क्राईम न्यूज अहिल्यानगर चीफ ब्युरो प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे संपर्क 70 286 23 100
अहिल्यानगर दिनांक २७/०२/२०२६ जिल्ह्यातील राहता तालुक्यातील सावळी विहीर येथील एका दगडाच्या खाणीत सासलेल्या पाण्यात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरचा हा मृतदेह रांजणगाव खुर्द येथील सिद्धार्थ राजेंद्र गाढवे( वय26) या तरुणाचा असल्याची तपासअंती निष्पन्न झाले आहे. त्याच्या अंगातील जॅकेट आणि सॅंडल यावरून त्याच्या नातेवाईकांनी या मृत देहास ओळखले आहे. सिद्धार्थ गाढवे हा वेल्डरचा व्यवसाय करीत असून परिसरामध्ये तो सर्वांचा आवडता असल्याने व तो घरातील कर्ता मुलगा असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्यावर होती .त्यामुळे संपूर्ण रांजणगाव रांजणगाव परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी तो कामानिमित्त घराबाहेर पडला होता. कामाच्या व्यापामुळे तो अनेकदा घराबाहेर राहत असल्यामुळे सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या बाबत काही शंका वाटली नाही. परंतु आता बरेच दिवस उलटूनही तो घरी येत नाही व त्याचा फोनही लागत नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांची चिंता ही वाढत गेली. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सावळी विहीर नजीक असलेल्या दगडाच्या खाणीमध्ये एक मृतदेह पाण्यात कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला. शिर्डी पोलिसांना याबाबतची खबर मिळताच तातडीने शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सदरचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे अशक्य झाल्यामुळे पोलिसांनी कायदेशीर व सोईस्कर रित्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तपासा दरम्यान पोलिसांनी मृत्यूच्या अंगावरील जॅकेट व जवळच असलेले पायातील सॅंडल बाजूला काढून ठेवले होते. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शिर्डी पोलीस स्टेशन गाठले. येथील कपडे आणि सॅंडल पाहताच तो आपलाच सिद्धार्थ आहे असे नातेवाईकांनी ओळखले. आणि सर्व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. सदरची घटना ही हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना होती. सिद्धार्थ हा घरातील कर्ता मुलगा असून कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरती होती. सिद्धार्थ हा मन मिळाऊ व सर्वांचा आवडता होता. त्याच्या या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण रांजणगाव परिसरावर दुःखाची छाया पसरली असून सर्वत्र हळहळ हळ हळ व्यक्त करण्यात येत येत असून संपूर्ण गाढवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
.



