आरोग्यआर्थिकमहाराष्ट्र

जनजीवन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधून ठेवल्या पण नळाला पाणीच नाही

बुलढाणा जिल्हा चिप ब्युरो सतीश पैठणी संपर्क 70 286 23 100

बुलढाणा दिनांक १७/२०/२०२६ टाकरखेड हेलगा येथे जलजीवन योजना अपूर्णच दोन पाण्याच्या टाक्या असूनही गाव नळ पाण्याविना स्वातंत्र्याची 75 वर्षे होऊनही अद्याप गावात नळ नाही चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा गावात आजही नळपाणी सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. गावात दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन योजने अंतर्गत गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. याशिवाय गावात पूर्वीच्या योजनेतून उभारलेली आणखी एक टाकी देखील आहे. मात्र दोन्ही टाक्या असूनही गावात नियमित नळपाणी पुरवठा सुरू झालेला नाही.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जल जीवन योजनेची कामे सुरू झाली तेव्हा गावात घरगुती नळजोडण्या व पाईपलाईनद्वारे पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु योजना अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना विहीर आणि बोरवेलवरच अवलंबून राहावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या काळात पाण्याची समस्या गंभीर बनत असून महिलांना पाण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून गावात नळपाणी सुविधा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, जल जीवन योजनेच्या कामांच्या प्रगतीबाबत प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button