आर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

वर्धा रत्नमाला मेंढा प्रकरणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती च्या आयोगाला शिक्षण विभागाची केराची टोपली

वर्धा जिल्हा चीफ ब्युरो जाफर मुलाने संपर्क 70 286 23 100

वर्धा दिनांक २७/०१/२०२६ रत्नमाला मेंढे प्रकरणात अन्यायाचा कळस – शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश बेकायदेशीर : भीम आर्मीचा थेट इशार येथील सौ. रत्नमाला मेंढे यांच्या पर्यवेक्षक पदासंदर्भात माननीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी दिनांक 3 सप्टेंबर 2025 व 27 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या निर्देशांनुसार तसेच माननीय अनुसूचित जाती–अनुसूचित जमाती आयोग, मुंबई यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेला निर्णय अंतिम व कायमस्वरूपी असताना, तो धुडकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी वर्धा जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी केला आहे.

तसे असतानाही शिक्षण अधिकारी (माध्यमिक), वर्धा यांनी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दिलेला आदेश हा पूर्णतः नियमबाह्य, बेकायदेशीर व अन्यायकारक असून तो एस.सी./एस.टी. आयोगाच्या निर्णयाचा थेट अवमान करणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा आदेश म्हणजे सामाजिक न्यायावर घाला असून दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला अधिकृत पाठबळ देण्याचा प्रकार असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

या अन्यायाच्या निषेधार्थ भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी जिल्हा परिषद, वर्धा येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

भीम आर्मीच्या वतीने स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की, अनुसूचित जाती–अनुसूचित जमाती आयोगाच्या अंतिम निर्णयानुसार सौ. रत्नमाला मेंढे यांना तात्काळ न्याय देण्यात यावा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर आदेशाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा भीम आर्मीच्या वतीने वर्धा जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा थेट इशारा जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी दिला आहे.
यावेळी भीम आर्मीचे जिल्हा संघटक आशिष सलोडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, जिल्हा महासचिव अलकेश पाणबुडे, जिल्हा उपाध्यक्ष बबलू राऊत, मार्गदर्शक आशीष भाऊ मेश्राम यांच्यासह अनुराग डोंगरे, शुभम डूबदुबे, सनी खैरे, अजय मोटघरे, साहिल वाघमारे, बंटी नगराळे, वैभव लोखंडे, अविनाश मनवर, रोशन झामरे, आदर्श वाघमारे, तनय नारायने, संकेत नगराळे, अमन वाघमारे, विवेक गेडाम, अक्षय सावरकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button