आरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना घर मालकीणच स्वतःच घर द्यायची बीड पोलिसांची कारवाई

बीड पोलीस क्राईम न्यूज जिल्हा चीफ ब्युरो विनोद पटाईत संपर्क 70 286 23 100

बीड दि, २०/१२/२०२५, पालवन चौकात वेश्या व्यवसायावर AHTU चा छापा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई, पिडीत महिलेची सुटका,
वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांवर पोस्टे शिवाजी नगर मधे गुन्हा दाखल , अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना दिनांक १९/१२/२०२५ रोजी दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत पालवण रोड ला, पालवण चौक जवळ, एक महिला एका पुरुषाच्या मदतीने आपल्या राहत्या घरामध्ये महिलांना बाहेरुन बोलावून, वेश्या व्यवसाय करीत आहेत. सदर माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून PI कस्तुरे व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव या त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी १००० रुपयांची मागणी केली व डमी ग्राहकास वरच्या मजल्याच्या रूम मधे जायला सांगितले. डमी ग्राहकाने ठरल्या प्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावून छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या पुरुषास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अशोक ज्ञानोबा गदळे वय ६१ वर्षे रा. मादळमोही ता. गेवराई जि. बीड असे सांगितले. सदर पुरुषाची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या ५०० रू. दराच्या २ नोटा मिळून आल्याने त्या पंचासमक्ष जप्त केल्या. सदर ठिकाणी एक पीडित महिला मिळून आली. पीडीत महिलेला विश्वासात घेवून चौकशी केली असता , तिने सांगितले की, अशोक ज्ञानोबा गदळे आणि आशा सुंदर पवार वय ४५ वर्षे रा. पालवण रोड पालवण चौक जवळ जि. बीड हे दोघे महिलांना घरी बोलवून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेवून, पीडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. आरोपी अशोक गदळेची दोन पंचा समक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे डमी ग्राहकाने दिलेल्या २ नोटा मिळून आल्या. तसेच रुमची झडती घेतली असता १२ विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. दोन्ही नमुद आरोपींवर पीडीत महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन त्याच कमाईवर उदरनिर्वाह करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले व सदर महिलेचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३,४,५,६ व कलम ३(५) भा. न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे प्रभारी पोलीस उपअधीक्षक मुख्यालय , पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव , महिला फौजदार मीरा रेडेकर, महीला पोलीस हवालदार उषा चौरे, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलीस शिपाई योगेश निर्धार सर्व नेमणूक अ. मा. वा. प्र. कक्ष यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button