
नांदेड विशेष चीफ ब्युरो संपर्क 7028623100
नांदेड दिनांक 18/12/2025,केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला नांदेड–वाघाळा महानगर पालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागांमध्ये जागा मिळावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. विजय सोनवणे यांनी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला येत्या नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी सहा प्रभागांमध्ये उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व ‘दैनिक रिपब्लिकन गार्ड’चे मुख्य संपादक विजय सोनवणे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. डॉ. रामदासजी आठवले यांच्या दिल्ली येथील निवास स्थानी भेटून मागणी तथा निवेदन दिले. यावेळी महानगराध्येक्ष धम्मपाल धुताडे, शिवाजी भालेराव सोबत होते.
युतीनुसार भारतीय जनता पार्टी सोबत रिपाई पक्ष व सर्व कार्येकर्ते भक्कम उभा आहेत. त्यामुळे नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग क्र. 1 (अ) तरोडा खुर्द, प्रभाग क्र. 4 (अ) हनुमानगड प्रभाग क्र. 7 (अ) जयभिम नगर प्भाक क्र. 8 (अ) शिवाजी नगर प्रभाक क्र. 14 (अ) इतवारा प्रभाक क्र. 18 (अ) खडकपुरा या सहा प्रभागांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला निवडणूक लढविण्याची संधी देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.



