महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक
लातूरचे लोकप्रिय माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांना प्रवासादरम्यान सोलापूर हवेवर चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर हॉटेल चालक महिलेने खासदार साहेबांकडे काय मागणी केली

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे
सोलापूर दिनांक 27/8/2025 रात्री एक वाजता …प्रवासात सोलापूरजवळ एका छोट्याशा हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाली ताई शोभा गायकवाड कांबळे यांनी अगदी मनापासून गरमागरम, सुगंधी चहा बनवून दिला. चहा घेतल्यानंतर मी गाडीत बसलो तर ताई आणि त्यांचे सहकारी खास माझ्याकडे आले.
“खासदार साहेब, एक सेल्फी घ्यायची आहे… मी लातूरची आहे” असे त्यांनी हसतमुखाने सांगितले. अंधार असल्यामुळे फोटो नीट आला नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र प्रकाशापेक्षा जास्त तेजस्वी होता.
मलाही मनापासून छान वाटले… आपल्या गावाकडची माणसं, आपुलकीने भेटली की प्रवासाचा थकवा कधीचा नाहीसा होतो.



