आर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची सुवर्ण महोत्सवात नवीन राष्ट्रीय शैक्षनिक धोरणांच्या वाटचालित सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100

लातूर दि, ७/६/२०२५, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षणाचा वसा घेऊन १९५६ साली कै. रामचंद्र गुंडाजी जाधव या ध्येयवेड्या तरुणाने शिक्षणाचा प्रसार करताना सर्वांगीण विकासासाठी शिक्षण सुसंस्कारासाठी शिक्षण असा संदेश देत, त्यांनी कै. रामराव माधवराव पाटील, कै. डॉ. प्रमोद भिमराव हलगरकर, कै. गुंडाजी पिनाटे, कै. विठ्ठलराव पिचारे या आपल्या शिक्षणप्रेमी संवगड्यांना सोबत घेऊन कै. भिमराव पाटील यांच्या वास्तूत मलंग गल्लीत सन १९६२ साली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची मुर्हतमेढ स्थापित केली. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित श्री शिवाजी बालकमंदिर, प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाच्या उभारणीकारिता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना त्यानी केला . त्याच्या शिस्तप्रिय नेतृत्वाच्या सान्निध्यात शाळेने नेत्रदिपक प्रगती करत असतानाच, दि.१७ जून १९७९ रोजी संस्थापक सचिव रामचंद्र जाधवांच्या अकाली निधनामुळे संस्था पोरकी बनली , संस्थेची नव्याने उभारणी करताना डॉ. प्रमोद हलगरकर यांनी आपल्या कौशल्याने नवे जुने व शालेय कर्मचाऱ्यांना एकत्रित करून संस्थेला नवसंजीवनी दिली.
१९८२ ला ही गुळमार्केट स्थित असलेली ‘शिवाजी शाळा’ जुना औसा रोड येथे कोथींबरे यांच्या वाड्यात स्थलांतरित केली गेली. एकूणच जुन्या पिढीतील शैक्षणिक वसा जोपासणाऱ्या कै. रामचंद्र गुंडाजी जाधव, कै. रामराव पाटील रामेगावकर, कै. डॉ. प्रमोद हलगरकर, नंतर तत्कालीन संस्था अध्यक्ष कै. रामराव पाटील यांचे भाच्चे प्रा. शेषराव मोहिते पाटील शिंगणाळकर, जावाई प्रा. वसंत भीमराव पाटील व चिरजीव डॉ. नरेंद्र रामराव पाटील रामेगावकर, समवेत संस्थापक सचिव कै. रामचंद्र जाधव यांचे चिरजीव अजय रामचंद्र जाधव व जावाई बालाजीराव पौळ व कै. डॉ. प्रमोद हलगरकर यांचे चिरजीव संजय प्रमोद हलगरकर यांच्या हाती शैक्षणिक संकलनाची सूत्रे वारसा रूपाने सोपवली गेली.
संस्थापक अध्यक्ष के. रामराव पाटील यांचे वारस डॉ. नरेंद्रजी पाटील यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली. तर
संस्थापक सचिव के. रामचंद्र गुंडाजी जाधव यांचे वारस अजय रामचंद्र जाधव यांनाही सचिव पदाची जबाबदारी दिली गेली. ती निष्ठेने पार पाडत आहेत या सुवर्णक्षणाचे साक्षीदार प्रा. शेषरावजी मोहिते-पाटील मार्गदर्शकाच्या भूमिकेत कार्ये करत आहेत त्यांचे चिरंजीव तथा वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पाटील यांनी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या प्रेरणेने स्फूर्तीने शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने गरूड झेप घेतली. तसेच संचालिका तथा प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई नरेंद्र पाटील यांनी हा वारसा जोपासताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या ज्ञानवृक्षाने श्री ‘शिवाजी पॅटर्नची’ सावली बनुन संपूर्ण सरस्वतीचा परिसर व्यापून टाकला आहे. तसेच कै. डॉ. प्रमोद हलगरकर यांचे वारस संचालक संजयराज प्रमोद हलगरकर व संस्थापक सचिव कै. रामचंद्र गुंडाजी जाधव यांचे जावाई माजी प्राचार्य तथा संस्थेचे कोषाध्यक्ष बालाजीराव पौळ यांनी सर्व भौतिक प्रगतीचा ध्यास घेतला. तसेच संचालिका सौ. मेधाताई अजय जाधव, सौ. वैशालीताई उदय मोहिते पाटील
व कु. श्रुतीताई नरेंद्र पाटील यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती करिता शैक्षणिक वाटचालीस मोलाचे योगदान दिले आहे.
संस्था संचालक प्रा वसंतराव पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान शाखेपर्यंत सारे सोने केले आहे. संस्था कोषाध्यक्ष श्री बी.डी. पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली सद्यः स्थितीत शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. विज्ञाननिष्ठ संस्था अध्यक्ष डॉ. नरेंद्रजी पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे वादविवाद, कथाकथन, निबंध, चित्रकला, क्रीडास्पर्धा या सोबत गुणवत्ता विकासाकडे लक्ष देताना वासंतिक वर्ग, जादा तासिका अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग चालवले जातात त्यांच्या मार्गदर्शनामुळे शैक्षणिक, प्रगतीची परंपरा विद्यालयाने कायम जोपासली आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटी सराव चाचण्यातून पालकांना त्यांच्या पाल्याची वैयक्तिक प्रगती अहवालाद्वारे दर्शविली जाते. विद्यार्थ्यांच्या अधिक प्रगतीसाठी जे काही उपक्रम राबवता येतील ते वेळोवेळी राबवण्याचे कार्य ते करतात. नवीन राष्ट्रीय शैक्षनिक धोरणांच्या ध्यास घेऊन सीबीएसई पॅटर्न मराठी शाळेत सुरू करणारी व एनसीईआरटी अभ्यासक्रम राबवणारी पहिली मराठी शाळा ठरली आहे
दैनंदिन परिपाठाद्वारे आदर्श मूल्याची जपणूक व्हावी, या दृष्टीने उत्तम दर्जाचे शिक्षण देत सर्व विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे सर्व श्रेय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडे जाते. लातूरच्या शिक्षणक्षेत्रातील ध्रुवतारा ठरत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासताना
मराठी शाळेत सीबीएसई पॅटर्नच्या रुपाने गुणवत्तेचा एक नवा पॅटर्न पुढे आणत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रगतिशील ज्ञानार्जन व्हावे, याकरिता तज्ज्ञ संचालक तथा शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ डॉ. नरेंद्र पाटील यांनी शिक्षकांसाठी रिफ्रेश कोर्सची सुरूवात केली आहे.शिक्षणक्षेत्रातील बदल आत्मसात करताना अधुनिक तंत्रज्ञानी युगाचा अचूक अंदाज घेऊन आपल्या शिक्षकाला अष्टपैलू बनविण्याचे कार्य डॉ नरेंद्रजी पाटील सर व मार्गदर्शक प्रा शेषरावजी मोहिते पाटील शिंगणाळकर साहेब करत आहेत त्यांना संस्था सचिव श्री अजयजी जाधव साहेबांची मोलाची साथ लाभली आहे आपल्या मराठी शाळेतील सीबीएसई पॅटर्न ध्रुवताऱ्यासारखा लखलखीत राहील, त्याची किर्ती आसमंतात होईल.हा प्रगतीचा ध्यास घेऊन मार्गक्रमण करताना नव-नवीन संकल्पना निर्माण करून नव-नवीन ध्येय धोरणे उराशी बाळगून नवीन शिवाजी पॅटर्न उभा करण्याचे सामर्थ्य ही मंडळी दाखवत आहेत यानिमिताने संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचे केलेले हे सिंहावलोकन होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button