
मुंबई पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100
मुंबई दि,२/२/२०२५ संविधान साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात साजरा आपल्या कवितेतून संविधानाची जनजागृती व्हावी, व संविधानाचा प्रसार प्रचार व्हावा, संविधानाची मूल्य रुजवावी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथून संविधान रॅलीची मिरवणूक सुरू होऊन आचार्य अत्रे साहित्य नगरी रंगमंदिर कल्याण पश्चिम येथे सांगता करण्यात आली या साहित्य संमेलन उद्घाटन सत्रात विचारमंचावर उपस्थित महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड सम्मेलन अध्यक्ष डॉ. सुरेश माने ज्येष्ठ संविधानतज्ञ, हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त, प्रसाद बोरकर, उपआयुक्त, रमेश मिसाळ उपायुक्त, संजय जाधव उपआयुक्त, अनिता परदेशी शहर अभियंता, रमेश जाधव माजी महापौर, पालिका सचिव किशोर शेळके संस्था अध्यक्ष तथा संयोजक चंद्रकांत पोळ, कल्पना खरात इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कवितेतून संविधानाची जनजागृती संविधान साहित्य संमेलनात, कवी संमेलन रंगले. सदर कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड असून, प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण सदस्य प्रा .दौलतराव कांबळे होते यावेळी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे , जगदेव भटू, गजानना गावंडे , मिलिंद जाधव, ॲड. प्रज्ञेश सोनावणे, शाम बैसाणे, धम्मकिरण चन्ने , प्रिती माने, पी. वी .कांबळे, देवीलाल रौराळे, राजेंद्र बनसोडे यांनी कवितेतून संविधानाची जनजागृती केली.
सदर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.



