
पोलीस क्राईम न्यूज पुणे चिफ ब्युरो प्रशांत धर्मराज संपर्क: 7028623100
पुणे वाघोली दि,१/२/२०२५, वाघोलीतील अतिक्रमण मोहीम पुन्हा सोमवार पासून सुरू होणार ?
पो नि रेजितवाड यांचा चोख बंदोबस्त अनुचित प्रकार घडला नाही. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, आमदार माउलीआबा कटके यांचे सह वरीष्ठ अधिकारी यांच्यात अतिक्रमण बाबत बैठक झाली होती त्या नंतर मागिल दोन ते तीन दिवसांपासून वाघोली हद्दीतील अहमदनगर रोड,अव्हाळवाडी रोड सह इतर ठिकाणी मोठ्या फैजफाट्यासह अतिक्रमण मोहीम राबावण्यात आली आहे.शनिवार रवीवार सुट्टी असल्याने सदर मोहीम थांबवण्यात आली असुन सोमवार पासुन बकोरी फाटा ते न्युसिटी,केसनंदफाटा ते केसनंद गाव,केसनंद ते पेरणेफाटा अशी नियोजित अतिक्रमण मोहीम पुन्हा राबविण्यात येणार असल्याची अधिकृत स्वरुपात माहीती मिळाली आहे.हि कारवाई पुणे महानगरपालिका,पीएमआरडी, नॅशनल हायवे,यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात येतं असुन या कामी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली वरीष्ठ पो नि पंडीत रेजितवाड हे आपल्या कर्मचार्या सह चोख बंदोबस्त लावुन सुरक्षितता पार पाडताणा दिसत आहे तर महावितरणचे साह्यक अभियंता बाबर हे ही सर्व स्टाफ सह घटणास्थळावर लक्ष ठेवून आहेत.



