हिंजवडी बांधकाम विभागाची धडक कारवाई पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ता मध्ये

हिंजवडी पोलीस क्राईम न्यूज विशेष चीफ ब्युरो संपर्क: 70 286 23 100
हिंजवडी दि १७/१/२०२५, पर्यायी रस्ता करण्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी (दि.४) रोजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अतिक्रमणावर भर दिवसा कारवाई करण्यात आली जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) दिला असून,
हिंजवडी येथीलप्रमुख रस्त्यावरील कंपन्यांमुळे या भागात सतत वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे पर्यायी रस्त्याची गरज आहे. त्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहे. हिंजवडी येथे दोन टप्प्या अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सार्वजनिक विभागाने वारंवार अधिक्रमणधारकांना नोटीस देऊनही. या जागेचे अतिक्रमण हटवले गेले नसल्याकारणाने ही जागा शासन हस्तांतरित करण्याबाबत येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.



