मार्डी या गावातील नागरिकांनी लोहारा तशिलदार ला 26 जानेवारी दिवशी समशान भूमी साठी आत्मदहनाचा दिला इशारा

पोलीस क्राईम न्युज राहुल हौसलमल संपर्क: 70 286 23 100
धाराशिव (उस्मानाबाद) दि,१७/१/२०२५, लोहारा तालुका मार्डी या गावच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या
स्मशानभूमीची नोंद ही कायमस्वरूपी स्मशानभूमी असलेल्या गट नंबर 102 मध्येच घेणेबाबत हा निर्णय 26 जानेवारी 2025 पर्यंत नाही घेतल्यास 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा तहसिलदार यांना देण्यात आला..
मार्डी येथील जनतेतर्फे निवेदन देण्यात येते की मार्डी येथे पारंपारिक बौद्ध समाजाच्या (महार) स्मशानभूमी ची नोंद कागदपत्रे कोठेही नाही ही नोंद तात्काळ ग्रामपंचायत आठ अ तहसील कार्यालयातील सातबारा आठ अ वर व इतर कागदपत्रावर तात्काळ घेण्यात यावी याबाबत आपणास मार्डी येथील जनते तर्फे निवेदन देण्यात आलेले आहे हे निवेदन आपल्या कार्यालयात 28 नोव्हेंबर 2024 रोजी देण्यात आलेले आहे हे निवेदन देण्याची गरज का पडली याविषयी थोडक्यात माहिती अशी की दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी कांताबाई शंकर भालेराव या मयत झाल्यानंतर सध्याचे गट क्रमांक 102 सातबारा वरील मालक प्रफुल्ल देवकर यांनी कांताबाई भालेराव यांचा अंत्यविधी अडवला होता याबाबत आपणास फोनवरून व लेखी निवेदन ही देण्यात आलेले आहे परंतु आपल्या कार्यालयाकडून आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही
तसेच गट क्रमांक 102 हा प्रफुल्ल उमाजी देवकर (पाटील) यांनी राजेंद्र भिवा बंडगर यांच्याकडून 2019ते 2020मध्ये खरेदी केलेला आहे परंतु निजाम काळापासून या 102 गटांमध्येच बौद्ध समाजाचे लोक पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी करत होते 2024 पर्यंत या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी कसल्याही प्रकारचा कोणीही कसलाही अडथळा केलेला नव्हता परंतु राजेंद्र भिवा बंडगर यांनी त्यांच्या काही अडचणीमुळे जमीन विक्रीला काढली आणि स्मशानभूमीच्या जागेसह संपूर्ण गट हा प्रफुल्ल उमाजी देवकर(पाटील)व देवकन्या प्रफुल्ल देवकर (पाटील) यांना विक्री केली आणि यांनी फेर एप्रिल 2020 मध्ये करून घेतला आणि या चार वर्षांमध्ये दोन व्यक्ती ची मयत झाली त्यावेळी देखील या गट क्रमांक 102 मध्येच मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला परंतु नोव्हेंबर 2024 मध्ये कांताबाई भालेराव यांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी प्रफुल्ल उमाजी देवकर(पाटील)यांनी व त्यांचे बंधू यांनी अंत्यविधी रोखून प्रफुल्ल देवकर यांचे भावांनी समाजातील लोकांना अर्वाचे भाषेत शिवीगाळ केली व हायवाच्या टायर खाली मारण्याची ही धमकी दिली यानंतर मार्डी येथील सर्व बौद्ध समाजाच्या लोकांनी स्वाक्षरीनीशी आपल्या कार्यालयात याबाबत स्मशानभूमीची नोंद करण्यात यावी म्हणून आपल्याकडे निवेदन दिलेले आहे तरी देखील आपल्या कार्यालयाने एक ते दोन महिने झाले तरी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार आमच्याशी व स्मशानभूमीच्या बाबत केलेला नाही यावरून आपल्या कार्यालयाकडून स्मशानभूमीची नोंद घेण्यासाठी टाळाताळ होत असल्याचे दिसून येते
तरी आपण येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2025 रोजी पर्यंत याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावा अन्यथा याबाबत आपल्या कार्यालयाने कोणताही निर्णय न घेतल्यास 26 जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी सामूहिक आत्मदहन करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी व होणाऱ्या परिणामास आपले संपूर्ण तहसील प्रशासन पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील याची दखल घ्यावी



