भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर रस्ता मंत्री नितीनजी गडकरी कामाची घेतील का दाखल

खानदेश प्रमुख शशिकांत भालेराव संपर्क 70 286 23 100
नाशिक दिनांक ,११/०२/२०२६ अनिल भडांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुका इगतपुरी रायगड नगर येथील
वाडीव-हे ते विल्होळी नॅशनल हायवे च्या कडेला गेली एक महिन्यापासून कर्ब वॉल चे काम चालू असून हायवेच्या बाजूला चेंबर्स तयार केले जात असून ते काही प्रमाणात तुटलेले आहे पाईपाखाली खाली पीसी चे काम केलेली नाही त्यात m35 ग्रेट कॉंक्रीट जर केले असते तर चेंबर्सचे तुकडे इतक्या लवकर पडले नसते आणि सिमेंटची लाईनला चेंबर्स जॉईन पण केली नसून त्यात लाईनला सुद्धा जागोजागी क्रॅक पडलेले आहे यावरून जनतेचा पैसा मंत्री आणि त्याचे अधिकारी वर्ग यांनी नेमून दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला कामे देऊन सर्वांनी त्या कामात भ्रष्टाचार करून रुपयाची मलाई खाण्याचे काम नाशिक मध्ये चालू असून रस्त्याच्या लाईन वेड्यावाकड्या निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून खिसे भरण्याचे काम चालू आहे केंद्रीय रस्ते दळवळवण मंत्री यांनी याकडे लक्ष देऊन अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाला सुद्धा चपराक द्यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे जनतेचा पैसा चांगल्या ठिकाणी लागावा ही जनतेची मागणी आहे.



