मतिमंद हरवल्याने नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या मार्फत मतिमंद मुलगा वंश वानखेडे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आला

विदर्भ प्रमुख अनिकेत उमरेडकर संपर्क 70 286 23 100
नागपूर : ११/०२/२०२६ अमरावती रोडवरील सिद्धार्थ सोसायटी, ८ वा मैल येथील १२ वर्षीय वंश राजकुमार वानखेडे हा मतिमंद मुलगा दिनांक 09/02/2026 सोमवार रोजी सकाळी घरासमोर खेळत असताना अचानक सायकल घेऊन घरातून निघून गेला. मुलगा बराच वेळ घरी परत न आल्याने परिसरात चिंता निर्माण झाली होती.
दरम्यान दुपारी साधारण १२ ते १ वाजण्याच्या सुमारास वंश हा दहेगाव परिसरात आढळून आला. तेथील सजग नागरिकांनी तत्काळ पोलीस स्टेशन कळमेश्वर पीएसआय प्रवीण जी घोडाम , कॉन्स्टेबल कोमलतसेच मंगेश भाऊ गमे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर कळमेश्वर पोलीस प्रवीण जी घोडाम यांच्या मदतीने मुलाची ओळख पटवली.
पोलिसांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना कळमेश्वर पोलीस ठाण्यात बोलावले. आवश्यक पडताळणी केल्यानंतर वंशला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांच्या सतर्कतेचे आणि पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.



