गुटखा 11 लाख 36 हजार रुपयांचा गांधी चौक पोलीस स्टेशन ची कारवाई

मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100
लातूर दिनांक २५/१/२०२५ वाहनासह 11 लाख 36 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त. 02 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. पोलीस ठाणे गांधीचौक ची कारवाई,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवित येत आहे.
दिनांक 24/01/2025 रोजी पोलीस ठाणे गांधी चौक च्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीवरून पोलीस ठाणे गांधी चौक च्या पथकाने दिनांक 24/01/2025 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रिंगरोड वरून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 08 लाख 36 हजार 400 रूपयाचा विमल V1 नावाचा गुटखा,सुगंधित तंबाखू , 03 लाख रुपयाचे एक पिकअप वाहन असा एकूण 11 लाख 36 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे
1) सुनील भारतलाल राठी, वय 34 वर्ष, राहणार सुपारी हनुमान जवळ, मोती नगर, लातूर.
2) ज्ञानेश्वर भास्कर रावते, वय 30 वर्ष, राहणार करजगाव तालुका औसा जिल्हा लातूर.
यांचे विरुद्ध पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपींना मा. न्यायलासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 02 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात, पोलीस ठाणे गांधीचौक चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंडित भंडारे, पोलीस अमलदार दयानंद आरदवाड, दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे.



