आर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

वार्षिक क्रीडा सप्ताहाला उत्साहात सुरुवात ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथील क्रीडा सप्ताहाचे नेताजी जाधव यांच्या हस्ते उद्घाटन.

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100

लातूर दि २३/१/२०२५, शहरातील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाला दि 22 जानेवारीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन आशियाई तायक्वांदो महासंघाचे अधिकृत प्रशिक्षक तथा तायक्वांदो राष्ट्रीय पंच व वृत्तवाहिनी व डिजीटल वेब न्यूजचे संपादक नेताजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर व्यासपीठावर कबड्डी राष्ट्रीय खेळाडू तथा महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद सारोळे, संस्थाचालक सुयश बिरादार व सुजित बिरादार यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्याचे मन, मनगट आणि मेंदू मजबूत होण्यासाठी मैदानावर आले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये यशाच्या उत्साहासह अपयश पचवण्याची क्षमता मैदानावर घाम गाळताना निर्माण होते. प्रत्येक विद्यार्थी हा सर्वांगीण विकासासाठी खेळाडू असला पाहिजे. खेळाडूंना सराव करताना पुरेसा पोषक आहार व पाणी गरजेचे असते ते वेळेत घेतले पाहिजे असे मत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटक नेताजी जाधव यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली तर खेळाडूंनी परेड मलखांब व कराटे सारख्या चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थि लक्ष वेधून घेतले होते. मैदानावरील कबड्डी हॉलीबॉल सारख्या विविध सामान्यांचीही सुरुवात करण्यात आली. अशा क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने शालेय स्तरावर खेळाचे वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते व पुढे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतात. असे मत कबड्डी राष्ट्रीय खेळाडू दयानंद सारोळे यांनी व्यक्त केले. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल आयोजित केलेले या क्रीडा सप्ताहाचे व व्यवस्थापनाचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले

यावेळी शाळेचे शैक्षणिक प्रमुख रामेश्वर सगरे सर्व शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक धम्मानंद सरवदे यांनी व आभार रामेश्वर सगरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button