मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्याला अल्पवयीन बालीकींवर लैंगिक अत्याचार
नागपूर पोलीस क्राईम न्यूज अनिकेत उमरेडकर संपर्क 70 286 23 100
नागपूर दिनांक ०३/०२/२०२६,बालिकेवर लैंगिक अत्याचार तीन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात: सावनेर शहरातील घटना तीन अल्पवयीन मुलांनी शेजारी
राहणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सावनेर शहरात रविवारी (दि. १) उघड झाला. विशेष म्हणजे, हा प्रकार चाइल्ड हेल्पलाइनमुळे चव्हाट्यावर आला असून, सावनेर पोलिसांनी त्या तिन्ही अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगी आणि आरोपी समुदायातील आहेत. एकाच पीडित बालिकेचे आई, वडील उपजीविकेसाठी बाहेरगावी राहत असल्याने ती तिच्या म्हाताऱ्या आजीसोबत सावनेर शहरात राहते. तिच्या घराशेजारी राहणाऱ्या तिन्ही अल्पवयीन मुलांनी तिच्या अगतिकतेचा फायदा घेत ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. जिवे मारण्याची धमकी आणि सोशल मीडियावरील बदनामीच्या भीतीमुळे तिने हा अत्याचार वर्षभर सहन केला. दरम्यान, शनिवारी (दि. ३१ जानेवारी) नागपूर शहरातील चाइल्ड हेल्पलाइनला प्राप्त होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे यांनी लगेच तिचे सावनेर शहरातील घर गाठले. सुरुवातीला ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. मात्र, चमूतील सदस्यांनी तिला विश्वासात घेतले आणि तिने संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ (२) (एम), ६५ (१), ७०(२), ३५१, पोक्सो कलम ४ व ६, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई) व ६७ (बी) अन्वये गुन्हे दाखल करून व्हिडीओ क्लिपद्वारे ब्लॅकमेल तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत त्याची मोबाइल फोनमध्ये व्हिडीओ क्लिप तयार केली होती. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिघेही तिला ब्लॅकमेल करीत होते. या प्रकाराबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास किंवा कुणाला काही सांगितल्यास जिवे मारून टाकेन, अशी धमकीही तिघे तिला देत होते. त्यामुळे ती वर्षभरापासून प्रचंड दहशतीत जगत होती. तणावसदृश स्थिती हा प्रकार उघड झाल्याने काही नागरिकांनी तातडीने पोलिस ठाणे गाठले. शिवाय, तिच्या घराजवळ तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. अपर पोलिस अधीक्षक अनिल मस्के यांनी सावनेर गाठून संपूर्ण घटनाक्रम व स्थिती जाणून घेत परिस्थिती हाताळली. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला नागपूर शहरातील बालगृहात ठेवण्यात आले तर तिन्ही अल्पवयीन गुन्हेगारांची नागपुरातील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तिघांना ताब्यात घेतले.



