बीड जिल्ह्यात वर्षभराचा गुन्हेगारी चा आलेख ३८ खून १६८ खूनाचे प्रयत्न १५६ अत्याचाराच्या घटना ४९८ गर्दी करून मारामारी ३८६ विनयभंग चे गुन्हे

बीड पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100
बीड दि२६/१२ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन दिवसांपूर्वी परळीतील श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे याने ऊसतोड कामगार विकास जोगदंड याचे तोंड व डोके दगडाने ठेचून खून केला होता.
काल रात्री “श्रीहरी मुंडे” नावाच्या गुंडाने थेट अंबाजोगाई पोलिस चौकीच्या समोरच जमीर शेख या युवकाची कोयत्याने निर्घृण हत्या केली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे निघत आहेत. तरीदेखील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. एकंदरीतच बीड जिल्ह्यात कायद्याचे राज्य नसून जंगलराज सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील प्रशासनात स्वतःच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करून घेतात. प्रशासकीय व्यवस्था त्यांची गुलाम बनली आहे. परीणामी मुंडे समर्थक गुंडांना गुन्हेगारीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी व बीड मधील गुंडाराज संपवण्यासाठी २८ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय व सर्व जातीय-धर्मीय बांधवांचा विराट मोर्चा बीडमध्ये काढला जाणार आहे.



