आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रशहर

आयकॉन हॉस्पिटल डॉक्टर प्रमोद घुगे या आरोपीच्या नंतर दुसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुख्य संपादक: डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100

लातूर दि, २९/२४ पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आणखीन एक फरार आरोपी पोलीस ठाणे शिवाजी नगरच्या ताब्यात . की दिनांक 11/12/2024 रोजी आयकॉन हॉस्पिटल मधील बाळू भारत डोंगरे, वय 35 वर्ष यांचा मारहाण करून खून करण्यात आला होता. मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे डॉक्टर प्रमोद घुगे,अनिकेत मुंडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच नमूद आरोपी हे फरार झाले होते. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात गुन्ह्यातील फरार आरोपीचा विविध पथकाकडून शोध घेण्यात येत होता. दरम्यान गुन्ह्यातील फरार आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे, अनिकेत विष्णू मुंडे यांना स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या पथकांनी या आधीच ताब्यात घेतले असून नमूद गुन्ह्यातील आणखीन एक आरोपी जयराम देवीदास कांबळे याला पण पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या पथकाने दिनांक 28/12/2024 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी चौकातून ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button