
पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 70 286 23 100
छ. संभाजीनगर औरंगाबाद दि२२/१/२०२५ पोलिस मारहाणीत मणक्यावर घाव बसल्याने सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू! सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली व सभागृहाची दिशाभूल केली.
घाटी येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या पोस्टमोटम रिपोर्टमध्ये सोमनाथ सुर्यवंशीच्या मणक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झालाय, असा रिपोर्ट आहे.
ज्या पोलिसांनी सोमनाथला मारहाण केली, त्यांच्यावर मनुष्यवधाचा ३०२चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात जाहीरपणे खोटे बोलत असतील तर राज्याचे काय?



