महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

नाशिक जिल्ह्यात खळबळ जिवंत काढतोस व बंदूक गुन्हेगाराकडून पोलिसांनी केले जप्त

नाशिक जिल्हा चीफ ब्युरो शशिकांत भालेराव संपर्क 70 286 23 100

नाशिक दिनांक ,03/01/2026, गंगापूर पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी. दोन गुन्हे गारांकडून शस्त्र जप्त.वार गुरुवार रोजी गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2229 घनश्याम भोये यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, कॅनल रोड गंगापूर गाव सुला वाईन कडे जाणाऱ्या रोड जवळ नाशिक येथे पाईप मध्ये दोन इसम बसलेले असून त्यांच्याकडे गावठी कट्टा ( पिस्टल )आहे याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती देऊन आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती काजल मोरे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील यांनी कॅनल रोड या ठिकाणी सापळा रचून आरोपींना पकडून ताब्यात घेतले तेव्हा त्यांचे नाव व पत्ता विचारले असता आरोपी तौफिक हाशमी राहणार श्रमिक नगर शिवाजीनगर आणि समीर अशोक गुंजाळ राहणार गोवर्धन गाव नाशिक दोघांनी असे नाव व पत्ते सांगितले त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता तोफिक याच्या कमरेला एक देशी बनवटीचा गावठी कट्टा पिस्टल एक जिवंत काडतुस व एक बजाज पल्सर मोटार सायकल तसेच 30000 रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा आयफोन 14 प्रो मॅक्स कंपनीचा मोबाईल आणि 80000 रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा आयफोन 17 अॅप्पल कंपनीचा मोबाईल व शस्त्राचा मुद्दे माल आरोपींकडून हस्तगत केला सदरचे दोन्ही मोबाईल गंगापुर भागात रस्त्याने पायी जाणाऱ्यांच्या हातातून हिसकुन चोरी केलेले आहे. आरोपींवर गंगापूर पोलीस ठाणे येथे गुरव क्रमांक 363/2025 शस्त्र अधिनियम 3/25 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने देशी बनावटीचा गावठी कट्टा पिस्टल एक जिवंत काडतुस आरोपीने हे इसम फैजान शेख राहणार गोराबा काका मंदिराजवळ संजीव नगर अंबड मूळ राहणार बकबेर जिल्हा इटावा राज्य उत्तर प्रदेश यांच्याकडून खरेदी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असता गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील यांनी लगेच फैजान शेख चा शोध घेऊन त्याला सदरच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत उपायुक्त, सुधाकर सुराडकर सहाय्यक पोलीस आयुक्त,सरकारवाडा विभाग यांचे मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती काजल मोरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र मोहिते पोलीस अंमलदार 2229 घनश्याम भोये पोलिसअंमलदार 1448 मच्छिंद्र वाघचौरे पोलिस अंमलदार 930 राकेश राऊत पोलीस अंमलदार 1313 मुकेश गांगुर्डे पोलीस अंमलदार 1542 यश पोतन या सर्वांनी चोख कामगिरी बजावली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button