Uncategorized

चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळी कडून दोन लाख 88 हजार रुपयाचा मुद्देमाला सहित पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क : 70 286 23 100

लातूर दिनांक 4/7/2025, चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून चंदनाचे लाकडे बाळगणाऱ्याला अटक.02 लाख 88 हजाराचा मुद्देमाल जप्त.. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई.*

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात दि.02/07/2025 रोजी विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून औसा पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी परिसरामधील हनुमान नगर येथील एका पत्राच्या शेडवर छापेमारी करण्यात आली. सदर शेडमध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा गाभा व लाकडाची चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवले चंदन बाळगलेला एक इसम मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव,पत्ता विचारता त्याने

1) स्वप्निल संजीव माने वय 24 वर्ष राहणार आळवाई तालुका भालकी जिल्हा राज्य कर्नाटक
असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 72 किलो चंदन तसेच चंदनाची लाकडे तोडण्या व तासण्या लागणारे साहित्य,तराजू असा एकूण 02 लाख 88 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा येथे कलम 41,42 भारतीय वन अधिनियम 1927 व 04 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 303(2),3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, पोलीस अमलदार रामहरी भोसले, युसुफ शेख, चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव,कुंभार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button