आरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशहर

उदयनगर परिसरात भरदिवसा दरोडा!प्रकरणीगुन्हेगारांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी

उदयनउदयनगर पोलीस क्राईम न्यूज संपर्क 70 28623100


उदयनगर 06/11/2025, परिसरातील धोत्रा नाईक येथे २७ ऑक्टोबर रोजी भरदिवसा तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत आणि स्प्रे मारून दहशत निर्माण करत सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण उदयनगर परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी अमडापूर पोलिसांकडे ३ नोव्हेंबर रोजी पानगोळे यांनी केली आहे.
नेमके काय घडले?
धोत्रा नाईक येथील रहिवासी मनोज वामन पानगोळे यांनी या संदर्भात ३ नोव्हेंबर रोजी अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले तीन अज्ञात तरुण एका दुचाकीवरून त्यांच्या घरी आले.घरात मनोज पानगोळे यांची लहान भावजय एकटी असताना, चोरट्यांनी सर्वप्रथम तिच्यावर आणि घरातील पाळीव कुत्र्यावर रासायनिक स्प्रे मारून त्यांना निष्प्रभ केले. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील ७० हजार रुपये रोख रक्कम, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, १ चांदीचे ब्रेसलेट आणि सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ असा जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दांड्याने मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
चोरीदरम्यान चोरट्यांनी अत्यंत क्रूरता दाखवत भावजयच्या हातावर दांड्याने मारहाण केली. तसेच, चाकूचा धाक दाखवून “तुमच्या घराला चांगली अद्दल घडवू” अशी गंभीर धमकी दिली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.विशेष म्हणजे, पानगोळे यांच्या घरात सन २०२२-२३ मध्येही अशाच प्रकारे पावडर टाकून चोरीची घटना घडली होती. एकाच घरात दुसऱ्यांदा अशा स्वरूपाचा प्रकार घडल्याने धोत्रा नाईक परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.या गंभीर घटनेची तातडीने चौकशी करून पोलिसांनी आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार मनोज पानगोळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी अमडापूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button