आरोग्यआर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रशहरसामाजिक

चकलांबा पोलिसांची मालेगावात धडाकेबाज कारवाई

बीड जिल्हाची ब्युरो विनोद पटाईत संपर्क 7028623100

बीड दिनांक 28/10/2025 रोजी चकलांबा पोलीसांनी गुप्त माहितीद्वारे मालेगाव (बु.) शिवारातील गट क्र. २४८ मधील शेतात लावलेली गांजाची झाडे उखडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४२ किलो वजनाचा अंदाजे १२ लाख ५५ हजार रुपयांचा गांजाचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, श्रीराम बने या व्यक्तीने मालेगाव (बु.) गावाजवळील गट क्रमांक २४८ मधील शेतात गांजाची झाडे लावून त्यांची जोपासना केली आहे. यावरून पोलिसांनी तात्काळ स्टाफसह घटनास्थळी धाड टाकून खात्री केली असता, गांजासदृश्य काही झाडे आढळून आली. त्यानंतर नायब तहसीलदार कट्टे व मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सर्व झाडे जप्त करण्यात आली. एकूण ४२ किलो वजनाच्या गांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावाने किंमत सुमारे १२,५५,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button