आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

तहसील समोर नगरपालिका च्या विरोधात खेळ मांडला शहरातील नागरिकांचेआंदोलन

पोलीस क्राईम न्यूज मराठवाडा चीफ ब्युरो, मुख्तार मणियारसंपर्क 7028623100

औसा दिनांक 8/7/2025, आमदारांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणितऔसा नगरपालिकेच्या मूलभूत गरजांच्या गैरव्यवस्थापन विरोधात ‘खेळ मांडला’ आंदोलन आयोजित करण्यात आले होते.त्या निमित्ताने आज दिनांक 7 जूलै 2025 सोमवार रोजी औसा शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा पूरविण्यात अपयश आल्याने औसा तहसील कार्यालयासमोर अफसर शेख युवा मंचच्या वतीने खेळ मांडला आंदोलन करण्यात आले.या खेळ मांडला आंदोलनात आंदोलन करत्यांनी औसा शहरातील जनतेच्या मनातले विविध प्रश्न मांडले ते असे खालीलप्रमाणे

सफाई आणि घंटागाडी सेवा पूर्णपणे कोलमडलेली असून ती तातडीने सुरळीत करावी.शहरातील रस्त्यांवरील दिवे बंद असून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते, दिवाबत्ती दुरुस्त करावी.पाणीपुरवठा केवळ 15-20 दिवसांआड होतो, तो नियमितपणे दर 3-4 दिवसांनी केला जावा.

90 लाखांचे विकास काम फक्त 9 लाखांमध्ये उरकले जात असल्याचा आरोप, बोगस विकास कामे त्वरित थांबवावीत.4 कोटी रुपये खर्चून बांधलेले शौचालय कुलुपबंद, ती नागरिकांसाठी तातडीने खुली करावीत.

प्रचंड वाढलेली मालमत्ता कर (पट्टी) कमी करावा.औसा MIDC, जुने बसस्थानक, तहसील कार्यालय हे शहराच्या आर्थिक व व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे असून आमदारांनी त्याबाबतीत घेतलेली भूमिका चुकीची असल्याचा ठपका.

या सर्व मागण्यांवर तत्काळ आणि ठोस पावले उचलली नाहीत, तर ‘खेळ मांडला’ आंदोलन अधिक व्यापक व तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे जिल्हाध्यक्ष ,तथा माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख , तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे,अफसर शेख युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष जावेद शेख, औसा शहराध्यक्ष अँड. सय्यद मुस्तफा (वकील इनामदार), तसेच शेख मेहराज, युनुस चौधरी,गोंवीद जाधव, बालाजी शिंदे,अविनाश टिके,अमर रेड्डी, कृष्णा सावळकर, रुपेश दुधनकर, गजानन शिंदे,आनंद धम्मादीप बनसोडे, मुकेश तोवर, प्रदीप कांबळे,माजीद काझी, मधुकर नलगे,बासीद शेख,किर्ती ताई कांबळे व औसा येथील महिला आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button