सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात हातोडा घातला मुलगा देश सुरक्षा साठ कारगिल सीमेवर त्यात सैनिकाच्या परिवारावर जीव घेणे हल्ला

पोलीस क्राईम न्यूज पुणे जिल्हा चीफ ब्युरो सुभाष शेगर संपर्क: 70 286 23 100
अहमदनगर दि, ११/०१/२०२५ , महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑन ड्युटी सैनिकाच्या परिवारावर हल्ला
आज गाव, खंडाळा. तालुका, श्रीरामपूर. जिल्हा, अहमदनगर. येथील सध्या कारगिल सीमेवर कार्यरत असणारे त्या गावचे सुपुत्र जवान, ऋषिकेश संजय चव्हाण (4 मराठा लाईट इन्फंट्री) यांच्या आई वडिलांना त्यांच्या वडिलांचा सख्या भाऊ राजकुमार नारायण चव्हाण व पुतण्या पंकज राजकुमार चव्हाण या दोघांनी दगड व लोखंडी हातोड्याने मारहाण केली तसेच या सैनिकांच्या वडिलांचा त्या गावांमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय आहे त्या भाजीपाल्याच्या व्यवसायामधील सर्व भाजीपाला व कॅरेट रस्त्यावरती विस्कटून टाकले. सध्या वडिलांना डोक्यात हातोडा लागल्यामुळे ते ऍडमिट आहेत. त्यांच्या डोक्याला टाके पडलेले आहेत त्या गावातील त्यांचे सखे चुलत भाऊ मंगेश चव्हाण यांनी मला कॉल केला त्यानंतर मी श्रीरामपूर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष, सरदार साहेब तसेच बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस, माजी सैनिक, दादा गुंड यांना कॉल केला. त्यानंतर सरदार साहेबांनी काही माजी सैनिकांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले व हल्ला करणाऱ्या वडील व त्यांच्या मुलग्यावर गुन्हा दाखल केला. सुरुवातीला त्यांच्या घरचे गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता पण संघटनेचे लोक गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला. एवढेच काय एवढे मारहाण करून सुद्धा मारहाण करणाऱ्या राजकुमार यांचा प्रसाद नावाचा मुलगा जो पुण्यात नोकरीस आहे तो आत्ताच गावी आला त्याने व मारहाण केलेला त्याचाच भाऊ पंकज या दोघांनी मिळून पुन्हा त्या दुकानाची नासधूस केली. या लोकांचे एवढी गुंडगिरी कशासाठी? यासाठी सैनिक हो एकत्र या एकता असू दे अशा आजी-माजी सैनिक परिवारावरती हल्ला झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन या अन्यायास वाचा फोडली पाहिजे.. धिक्कार असो अशा हल्लेखोरांचा



