आरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेष

ऑपरेशन मुस्कान राबवून अपहरणाच्या गुन्ह्यातील 02 अल्पवयीन पीडित मुलींचा हैदराबाद येथून शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTU) यश

पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 7028623100

लातूर दि,७/१२/२०२४ पोलिसांची कामगिरी अशी की,17 वर्षीय 2 अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेले बाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन व देवनी पोलीस स्टेशन येथे 2 तक्रारी दाखल होत्या.

मागील दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीत पोलीस स्टेशन कडून संबंधित पीडित मुलींचा शोध सुरू होता. परंतु त्या मिळून येत नव्हत्या. पोलीस अधीक्षक अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेश व सूचनेवरून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात वरील पोलीस स्टेशनला दाखल तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनसह कडून समांतर तपास करण्यात येत होता.
दरम्यान AHTU ला मिळालेल्या गुप्त व तांत्रिक माहिती संकलन व विश्लेषणाचे आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) च्या टीमने अल्पवयीन मुलींचा हैदराबाद येथे शोध घेण्यात यश आले.
AHTU च्या पथकाने 2 दिवस हैदराबाद येथे सलग परिश्रम करून 2 अल्पवयीन पीडित मुली व त्यांचे सोबत 2 आरोपींना ताब्यात घेतले. मिळून आलेल्या पीडित मुली व आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सध्या लातूर जिल्हा पोलीस दल व AHTU चे पथक ऑपरेशन मुस्कान शोध मोहीम राबवत असुन त्या दरम्यान लातूर जिल्ह्यातील अपहरणाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलींचा व बेपत्ता मुलींचा शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली जात आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली AHTU च्या पोलीस निरीक्षक श्रीमती बबिता वाकडकर, पोलीस उपनिरीक्षक, श्रीमती श्यामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, पोलीस अमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अंमलदार सुधामती यादव, लता गिरी, चालक निहाल मणियार या AHTU च्या पथकाने पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button