लातूर महानगरपालिका चे अशोक एंटरप्राइजेस या कंपनीला स्वच्छतेचे दिलेले टेंडर एकाच पावसाने किती कुचकामी आहे ते दाखवून दिल

मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क : 70 286 23 100
लातूर दि,२९/५/२०२५, शहरात तुफान पाऊस झाला होता.त्यामुळे नाल्यात, शहरात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.तुंबलेल्या गटारी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर साफसफाई केली आहे.त्यातील गाळ, कचरा,राडारोड्याचे ठिकठिकाणी ढिग लागले आहेत.संपूर्ण लातूर शहरातील जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते.सर्व प्रशासकीय यंत्रणा दिवसरात्र राबत असताना कचरा उचलून घेण्यासाठी मनपाने लातूर शहरातील स्वच्छतेसाठी व कचरा उचलून घेण्यासाठी देण्यात आलेल्या अशोका इंटरप्रयझेस या कंपनीचे काम त्यांच्या मर्जीनुसार करत असल्याने दिसून येत आहे.
आजही अनेक भागातील गटारीतील काढलेला गाळ,राडारोडा,कचरा जशासतसा पडून असल्याचे दिसून येत आहे.अनेक घंटा गाड्या चार्जिंग नसल्याने बंद असल्याची बातमी आहे तर ट्रॅक्टर मजूर नसल्याने नालीतील गाल,रोडारोड,कचरा उचलून घेतला जात नसल्याचे बोलले जात आहे.आता जर पाऊस पडला तर तोच गाळ, राडारोडा,कचरा गटारीत जाऊन पुन्हा गटारी तुंबण्याचा व नागरिकांच्या घरात परत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.



