
पोलीस क्राईम न्यूज मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क:7028623100
कोपर्डी दि,९/१२ ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीच्या विवाह सोहळ्याची
रेशीमगाठ बांधत होते…
तर शरद पवार मारकडवाडीत आंदोलनाची आग पेटवत होते.
काल महाराष्ट्रात दोन मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम पार पडले.
एकीकडे कोपर्डी येथिल बलात्कार पीडितेच्या
बहिणीचा विवाह सोहळा पार पडला .
या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवर्जून उपस्थित राहिले होते.
तर दुसरीकडे शरद पवार मारकडवाडी येथे EVM विरोधात आंदोलनास फुस लावत होते.
महाराष्ट्रात मागच्या 40-50 वर्षात शरद पवारांच्या चेल्याचपाट्यानी आणि चाट्या पत्रकारांनी त्यांची प्रतिमा मराठा नेता अशी तयार करून ठेवली होती.
मराठा समाजाच्या उन्नतीला खिळ ठोकणारा हा कारस्थानी नेता राजा विक्रमाच्या पाठीवर बसलेल्या वेताळासारखा मराठ्यांच्या मानगुटीवर घट्ट चिकटवून टाकण्यात आला.
उभ्या राजकीय आयुष्यात शरद पवारांनी सतत सत्तेचा ऊबदार गालिचा पांघरला मात्र शेतात राबणारा मराठा तसाच उन वारा झेलत थंडीने कुडकूडत ठेवला.
2014 साली सत्ताबदल झाला आणि त्याच दरम्यान कोपर्डी गावात एका मराठा भगिनींवर अत्यंत क्रूर अत्याचाराची घटना घडली.
या घटनेने सगळा मराठा समाजासह सरसकट समाज ढवळून निघाला.घटनेचा संताप एवढा मोठा होता की महाराष्ट्रभरात लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले.
त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा अत्यंत बारकाईने तपास करून आरोपीना फाशीची शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
पीडित मुलीचे कुटुंब, पोलीस, कायदेतज्ञ व प्रशासन याचा समन्वय साधुन त्या पीडितेला न्याय मिळवून देणारे नेते म्हणून त्या पीडित मुलीच्या आई वडिलांनी फडणविसांचे जाहीर कौतुक केले.
दुर्दैवाने 2019 ला फडणवीस यांना चकवा देत ठाकरे -पवार यांनी सत्तेच्या लोण्याचा गोळा पळवला.फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होता होता विरोधीपक्ष नेता बनून राहिले.
विषय फडणविसांची सत्ता जाण्याचा नव्हता तर ज्या मराठा समाजाच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी सगळी सत्ता फडणविसांनी कामाला लावली होती तो कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा मुद्दा ठाकरे पवारांच्या सत्तेत विसर्जित करण्यात आला.
आरोपीना फासावर चढवन्यापर्यंत पोहचलेला हा खटला वरच्या न्यायालयात ढकलून शिथिल करण्यात आला ज्याच्या पाठीमागे पवारांचे गठ्ठा मतदान धोरण होते.
आज तो खटला विसर्जित झाल्यात जमा आहे.
आणि स्वतःला मराठा म्हणवणारा कोणताही आंदोलक नेता सत्तेची समीकरण जुळवन्यातला अडसर म्हणून कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा उल्लेख सुद्धा करत नाही.
तर या प्रकरणातील पीडित मुलीच्या बहिणीचा काल विवाह सोहळा पार पडला.
कोपर्डी प्रकरणात ज्याप्रमाणे फडणवीस तीळतीळ झिजले होते ते त्या कुटुंबाने पाहिलं होतं.
फडणविसांची न्याय मिळवून देण्यासाठी असलेली आंतरिक तळमळ पाहिली होती…
आणि म्हणून त्या कुटुंबाने आपल्या विवाह सोहळ्यात फडणविसांनी आवर्जून उपस्थित राहायला हवं यासाठी आत्मीयतेच आमंत्रण फडनविसांना दिलं होतं.
या आत्मीयतापुर्वक दिलेल्या आमंत्रनाचा स्विकार करत फडणवीस हे काल कोपर्डी येथे विवाह सोहळ्यात वधू वरांची रेशीमगाठ बांधत होते.
तर त्यांच्या बरोबर आलेल्या प्रवीण दरेकर यांनी मंगळाष्टक म्हणून या लग्नसोहळ्याची उंची कैकपटीने वाढवली.
एकीकडे हा हृदयस्पर्शी विवाहसोहळा सुरू होता.
दोन कुटुंबातील स्नेह फडणविसांच्या उपस्थितीत वृद्धिंगत होतं होता…
फडणवीस कोपर्डीच्या विवाह सोहळ्याची
रेशीमगाठ बांधत होते…
तर शरद पवार मारकडवाडीत स्वतःचा पराभव लपवन्यासाठी आंदोलन पेटवत होते.



