देश-विदेशमहाराष्ट्रशहर

जाता जाता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा किनगावच्या गुटका गोडवानाला दणका

मुख्य संपादक डी एल वाघमारे संपर्क: 7028623100

लातूर दि,२३/५/२०२५. किनगावअधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात 01 मे 2025 पासून अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी “अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान-1″संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 23/05/2025 रोजी पोलीस ठाणे किनगाव पोलिसांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी किनगाव येथील काही इसम प्रतिबंधित गुटखा साठवून करून अवैध विक्री व्यवसाय करीत आहे अशी माहिती मिळाली. सदर माहितीवरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात आज दिनांक 23 5 2025 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे किनगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांचे नेतृत्वातील पथकाने कार्यवाही करत कार्यवाही किनगाव येथील एका फर्निचरच्या दुकानाच्या पाठीमागील गोडाऊन मध्ये छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 11 लाख 72 हजार 860 रुपयांचा गुटखा व एक 7 लाख रुपये चा पिकअप वाहन असा एकूण 18 लाख 72 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठा व विक्री करीत असताना मिळून आलेला इसम नामे

1) शहबाज शेख रा. किनगाव

2)गोविंद उदरे रा. किनगाव 3)संतोष फड,रा. सौंदाना ता.परळी जिल्हा बीड.
याचे विरुद्ध पोलीस ठाणे किनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ शिरसाठ पोलीस अमलदार महादेव दहिफळे,अनिल इस्टाळकर, सुरज कोतवाड, शिवाजी गोरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button