आरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर

तलवार हातात घेऊन शहरात दहशत करणाऱ्याला बीड पोलिसांनी केली अटक

बीड जिल्हा चीफ ब्युरो विनोद पटाईत संपर्क 7028623100

बीड दिनांक 16/11/2025 रोजी 14:15 वा. चे सुमारास अजिजपुरा, नूर मस्जिद च्या बाजूला बीड शहरात तलवार घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीस बीड शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांकडून अवैध शस्त्रधारकांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
सदरील व्यक्ती शेरसिंग हिंदू सिंग टाक, वय अंदाजे 55 वर्ष, रा. वडवणी, ता.वडवणी जि.बीड असून त्याच्याकडून आणखीही अवैध शस्त्रे मिळण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी सर्व पोलिस ठाणे प्रमुखांना निवडणूक काळात अवैध शस्त्रे जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने बीड शहर पोलिसांनी तत्परता दाखवत ही कारवाई केली आहे.

बीड शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणाकडेही अवैध शस्त्र, तलवार, दारुगोळा किंवा गावठी पिस्तूल असल्याची माहिती असल्यास
मो. 7588807774 किंवा पीएसआय महेश जाधव – मो.9021216256
यावर कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार व पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
एपीआय श्री. खेडकर, पीएसआय श्री. महेश जाधव, श्री. गणेश कुमावत तसेच पोलिस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, राम पवार, सुशेन उगले, इलियास शेख यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button